agriculture news in Marathi exempt shops of agricultural machinery and its spare parts Maharashtra | Agrowon

शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना लॉकडाऊनधून वगळले

वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाऊनमधून शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे आणि स्पेअरपार्टस् च्या दुकानांना सूट दिली आहे, यासंबंधीची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता.३) लॉकडाऊनमधून शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे आणि स्पेअरपार्टस् च्या दुकानांना सूट दिली आहे, यासंबंधीची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि अवजारे विक्री करणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. 

‘‘शेतीकामासाठी लागणारी यंत्रे, त्यांचे स्पेअरपार्टस् (पुरवठा साखळीसह) आणि यंत्रे दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमधून या दुकानांना वगळण्यात आले आहे. महामार्गांवर दुरुस्तीची दुकाने, विशेषतः पेट्रोल पंपांवरील दुकाने आणि चहा उद्योग तसेच मळ्यांमध्ये कमाल ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कामांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक काळजी घेण्यात यावी,’’ असे जारी केलेल्या सूचनेत गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे.

कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके उद्योगाला लॉकडाऊनमधून आधीपासूनच वगळले होते. मात्र, कृषी अवजारे विक्रेते, दुरूस्ती करणारी दुकाने तसेच सुटया भागाची विक्री करणारे दुकाने उघडी ठेवण्यास बंदी होती. 

 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...