Agriculture news in Marathi Exercise to get crop insurance after a natural disaster | Page 2 ||| Agrowon

अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा मिळविण्यासाठी कसरत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

गेल्या हंगामात सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. उत्पादकता कमी झाली. पैसेवारीही कमी निघाली. तरीही पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांना कसरतीचा काळ आहे.

अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने काढण्याचा आग्रह केला जातो. विमा काढल्याने रिस्क कमी होते, असा दावा केला जातो. परंतु शेतकऱ्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा आहे. गेल्या हंगामात सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. उत्पादकता कमी झाली. पैसेवारीही कमी निघाली. तरीही पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांना कसरतीचा काळ आहे.

अकोला जिल्ह्यात केवळ एका मंडळात सोयाबीन पिकाचा विमा देण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद मतदारसंघातील तालुक्यात मदतच मिळाली नाही. या भागातील लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना दुसरा खरीप सुरू झाला तरी विमा न मिळाल्याने आंदोलने करीत आहेत. कंपन्यांकडून केले जाणारे दावे पाळले जात नसल्याचा अनुभव अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात यंदा १ लाख ९० हजारांवर शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.

विमा कंपनीचे स्वतंत्र कार्यालय नाही
अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी (ईआरजीओ) या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडे संपर्क साधण्यासाठी अडचणी येऊ नये, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करू नये यासाठी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातच कंपनी प्रतिनिधींसाठी कक्ष सुरू करण्यात आला. या ठिकाणी कंपनी प्रतिनिधी दिवसभर बसून तक्रारी घेत असताना दिसून आले. याशिवाय प्रत्येक तालुक्यात एक प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात नेमण्यात आला. अकोला जिल्ह्यात कंपनीकडे तक्रारी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती, पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. भरपाईच्या अनुषंगाने ७२ तासांच्या आत कंपनीला माहिती कळविण्याचे संदेश शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी विमा कंपनी, कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावोगावी शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत
- डाॅ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला

अतिवृष्टीमुळे माझे सहा ते सात एकरांतील पिकाचे नुकसान झाले. या बाबत हेल्पलाइनवर चार दिवस संपर्क साधला. एकदा संपर्क झाला असता कर्मचारी उद्धट बोलला. सर्व कागदपत्रे असतील तरच बोला, उगाच आमचा वेळ घालवू नका असे म्हणत त्याने उद्धटपणे फोन ठेवून दिला. त्यानंतर पुन्हा संपर्क झालाच नाही. त्यांनी व्हाइस मेसेज पाठवून अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला. अॅप घेतले तर ओटीपी मिळाला नाही. लाइव्ह फोटो पाठविण्याचे सांगितले. तर लिंकवर फोटो गेलेच नाहीत. अकोला तालुका कृषी कार्यालयात गेलो तर तेथे कंपनीचा कोणीही कर्मचारी नव्हता. शेवटी तक्रार अर्ज कृषी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने सादर केला. यंदा कृषी कार्यालयात कर्मचारी मिळाला नाही.
- विशाल नंदकिशोर जयस्वाल, सांगळूद, ता. जि. अकोला

विमा कंपन्यांकडून जी हेल्पलाइन दिली जाते त्यावर संपर्क केला तर तो फोन उचलल्या जात नाही. नुकसान कळविण्यासही अडचणी येतात. बहुतांशवेळा नदी, नाले, ओढ्यांना पूर असतो. शेतात जाता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज येत नाही. ॲप वापरताना शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञानाचा अभाव असतो. खेड्यात मोबाईल रेंजच्या अडचणी येतात. दरवर्षी विमा कंपनी बदलली जाते. त्याची सूचना व माहिती पत्रकावर कार्यालयाचा पत्ता नसतो. अशा असंख्य अडचणी आहेत.- गणेश नानोटे, शेतकरी, निंभारा, जि. अकोला

दरवर्षी संपूर्ण शेताचा विमा काढतो. परंतु ज्या पिकाचे क्षेत्र कमी राहते त्यालाच विमा मिळतो, असे दिसून आले. विमा कंपनीचा फोन कधी उचलल्या जात नाही. तालुक्यात कुठे कार्यालय आहे, याची माहिती मिळत नाही. नुकसान झाल्यावर कधीही आजपर्यंत विमा कंपनीचा माणूस शेतात आलेला नाही. यामध्ये मोठ्या सुधारणांची गरज वाटते.
- ज्ञानेश्‍वर तायडे, शेतकरी, कारला, ता. पातूर, जि. अकोला


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...