कमी खर्चामध्ये पॉलिहाऊस बनविण्याचे प्रयत्न व्हावेत 

पॉलिहाऊसचे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर आहे. हवामान बदलाचा सातत्याने शेतीवर, पिकविलेल्या शेतमालावर, शेतमालाला आणि मिळणाऱ्या बाजारभावावर होत आहे.
Ashok-Dalwai
Ashok-Dalwai

नगर ः पॉलिहाऊसचे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर आहे. हवामान बदलाचा सातत्याने शेतीवर, पिकविलेल्या शेतमालावर, शेतमालाला आणि मिळणाऱ्या बाजारभावावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षित शेती हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणारे आहे. या तंत्रज्ञानाद्वारे बिगर हंगामात शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेऊ शकतो. विद्यापीठाने कमी खर्चामध्ये पॉलिहाऊस बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे, असे मत भारत सरकारच्या राष्ट्रीय कोरडवाहु प्रक्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कास्ट-कासम या प्रकल्पाच्यावतीने हवामान अद्ययावत शेतीसाठी संरक्षित लागवडीचे तंत्रज्ञान या विषयावर दोन आठवड्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले. त्याच्या समारोप कार्यक्रमात डॉ. अशोक दलवाई बोलत होते. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा ऑनलाईन उपस्थित होते. गोवा राज्याचे कृषी संचालक नेव्हिल अल्फोंसो, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुणे येथील पुष्प सुधार संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, कास्ट प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. प्रभात कुमार, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, डॉ. मुकुंद शिंदे आदी उपस्थित होते. 

डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले की, ‘‘लॉकडाऊनमुळे प्रत्यक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहे. शेती क्षेत्रात सुद्धा मोठे बदल अपेक्षित आहे. यासाठी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात वाढणार आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक सचिव तथा प्रकल्प सहसमन्वयक, डॉ. जयश्री पाचपुते यांनी केले. या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून तसेच भारताबाहेरूनही २५० प्रशिक्षणार्थींनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणासाठी समन्वयक म्हणून डॉ. प्रदिप दळवी, डॉ. महेश खामकर व मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com