Agriculture news in Marathi, For exhibiting varieties of Agriculture University, there are three demonstrations in the district | Agrowon

कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात साडेतीनशे प्रात्यक्षिके
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भाताची वाणे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात साडेतीनशे प्रात्यक्षिके घ्यावीत, अशा सूचना कोकण कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याची बैठक नुकतीच कृषी कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. या वर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजन व खरीप संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतीशाळा उपक्रम सुरू केली आहे.

रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भाताची वाणे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात साडेतीनशे प्रात्यक्षिके घ्यावीत, अशा सूचना कोकण कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याची बैठक नुकतीच कृषी कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. या वर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजन व खरीप संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतीशाळा उपक्रम सुरू केली आहे.

कोकणात भात बियाणे बदलाची परिस्थिती सुधारली असून, बियाणे बदलाचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. मागील काही वर्षांत महाबीज मोफत वितरित होणाच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होऊन खासगी कंपन्यांच्या वाणाचे भात बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत आहेत. आक्रमक जाहिरातीमुळे शेतकरी खासगी कंपन्यांच्या वाणाकडे आकर्षित होतात. काही कंपन्यांचे संकरित बियाणे बाजारात आणले असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो अशा अत्यंत महागड्या दराने शेतकऱ्यांना विकतात. मोठी किंमत मोजूनही शेतकऱ्यांना फायदा होतो, याबद्दल शंका आहे. 

तुलनेने विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे स्वस्त असून विद्यापीठ, बीजगुणन केंद्र व महाबीजमार्फत अत्यंत माफक किमतीत उपलब्ध आहे. तरीही गुणधर्माबाबत शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही. 

कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून विकसित केलेल्या वाणांचा दर्जा, उत्पादकता देखील खासगी कंपन्यांच्या वाणांच्या तुलनेत उच्च आहेत. कोकण कृषी विद्यापीठामार्फत कर्जत-२, कर्जत-३, कर्जत-५ व कर्जत-७ या जाती विकसित केल्या आहेत. कोकणात जया ही जात भाताची पेज व भाकरीकरिता लोकप्रिय आहे; परंतु या जातीचे शुद्ध बियाणे उपलब्ध होत नाही. या जातीला पर्याय म्हणून कर्जत- ५ ही लांबट जाड दाण्याची निमगरवी जात प्रसारित केली आहे. 

कर्जत-७ ही लांबट बारीक दाणे असलेली हळवी जात रत्ना या जातीला पर्यायी जात म्हणून विकसित केली आहे. नुकतीच विद्यापीठाने कर्जत-८ व कर्जत-९ या दोन जाती अधिसूचित केल्या असून, त्यांची देखील उत्पादन क्षमता चांगली आहे. कर्जत-१० लांब बारीक दाणे असलेली गरवी जात असून त्याचे हेक्टरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादकता आहे. ट्रॉम्बे कर्जत कोलम ही आखूड, बारीक दाणे असलेली निमगरवी जात आहे. ती वाण १० ते १२ वर्षांच्या संशोधनानंतर व त्यांची सर्व कोकणात चाचणी होऊन अधिसूचित केल्यामुळे ती सिद्ध वाण आहेत.

मेळावे, रोहिणी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन
या उलट खासगी कंपन्यांचे वाण अधिसूचित नसून या वाणांच्या संशोधन, चाचण्या व सिद्धतेबाबत शेतकऱ्यांना कोणतीही माहिती नसते. यासाठी कृषी विद्यापीठाकडील वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्याकरिता कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रशिक्षण, मेळावे, कृषी वार्ताफलक, शेतीशाळा, रोहिणी पंधरवडा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच प्रत्येक वाणांचे प्रत्येक गावात कमीत कमी ५ गुंठे क्षेत्रावर विनाअनुदानित लागवड किंवा प्रात्याक्षिके घेण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...