Agriculture news in marathi Exhibition of new grape varieties in Pune | Agrowon

पुण्यात द्राक्षाच्या नव्या जातींचे प्रदर्शन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने बुधवार (ता. १२) द्राक्ष दिवसाचे आयोजन केले होते. या निमित्ताने केंद्राने विकसित केलेल्या मांजरी नवीन, मांजरी श्यामा, मांजरी मेडिका आणि मांजरी किशमिश या नव्या जातींचा परिचय शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना काढणीच्या नजीक असलेल्या द्राक्षवेली पाहता आल्या. 

पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने बुधवार (ता. १२) द्राक्ष दिवसाचे आयोजन केले होते. या निमित्ताने केंद्राने विकसित केलेल्या मांजरी नवीन, मांजरी श्यामा, मांजरी मेडिका आणि मांजरी किशमिश या नव्या जातींचा परिचय शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना काढणीच्या नजीक असलेल्या द्राक्षवेली पाहता आल्या. 

शेतकऱ्यांचे स्वागत डॉ. ध. न. गावंडे यांनी केले. द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी या वाणासंबंधी शेतकऱ्यांचे शंका, समाधान आणि मार्गदर्शन केले. उत्पादक महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे आजी, माजी पदाधिकारी सुभाष आर्वे, अरविंद कांचन, सांगली अध्यक्ष चंद्रकांत लांगडे, वासुदेव काठे, कैलास भोसले, अभिनव टिकेकर आदी उपस्थित होते. डॉ. अ. कु. शर्मा यांनी आभार मानले. 

प्रदर्शित नव्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये

मांजरी नवीन

सेटेंनियल सिडलेसपासून क्लोनल सिलेक्शनद्वारे विकसित वाणाची द्राक्षे हिरवी, मोठ्या आकाराची, एक सारखी, सुगंधित आणि बिनबियांची असतात. परिपक्वतेचा कालावधी कमी (१०५ ते ११० दिवस) असून, संजीवकाची आवश्यकता कमी आहे. उत्पादन प्रति वेल १२ ते १४ किलो आहे.

मांजरी मेडिका 

जात पुसा नवरंग आणि फिल्म सिडलेस यांच्या संकरातून विकसित केली आहे. काळ्या रंगाची ही जात रस उत्पादनासाठी उपयुक्त आहे. आरोग्यासाठी लाभदायक आहे. परिपक्वतेचा कालावधी १२० ते १३० दिवसांचा आहे. प्रति वेल उत्पादन १६ ते १७ किलो इतके आहे.

मांजरी किशमिश 

ऊत्परिवर्तित किशमिश रोजावीसमधून विकसित केलेली ही जात खाणे व बेदाण्यासाठी उपयुक्त आहे. साखरेचे प्रमाण जास्त २३ ते २४ अंश ब्रिक्‍स असल्याने बेदाना रिकव्हरी अधिक प्रमाणात होते. हिरव्या रंगांच्या द्राक्ष वेलींची उत्पादन क्षमता प्रति वेल १५ ते २० किलो आहे.

मांजरी श्यामा 

ब्लॅक चंपा आणि थॉमसन सिडलेस या जातींच्या संकरातून विकसित वाणाची द्राक्षे काळ्या रंगाची आणि बियाणे रहित आहेत. या वेलीची उत्पादन क्षमता प्रति वेल १७ ते २० किलो इतकी आहे. हा वाण फळ छाटणीनंतर १३० ते १३५ दिवसांत परिपक्वता गाठतो.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...