'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान

'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. १६) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. याशिवाय मुंबईतील ऍड. आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह अकरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 11 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत मंत्र्यांची नावे निश्‍चित केली होती.

भाजपकडून विदर्भातील डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, औरंगाबाद येथील अतुल सावे, सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर, विधान परिषद सदस्य तानाजी सावंत, रत्नागिरीचे उदय सामंत यांना शपथ देण्यात आली. 

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर

जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली.  मंत्री

 राधाकृष्ण विखे-पाटील

जयदत्त क्षीरसागर

आशीष शेलार

डॉ. संजय कुटे

सुरेश खाडे

डॉ. अनिल बोंडे

तानाजी सावंत

उदय सामंत

अविनाश महातेकर

संजय ऊर्फ बाळा भेगडे

योगेश सागर

शिवाजीराव नाईक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com