Agriculture news in Marathi, Expansion of 'Team Devendra'; Location of Vikhe Patil, Kshirsagar | Agrowon

'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर यांना स्थान
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. १६) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. याशिवाय मुंबईतील ऍड. आशीष शेलार यांना संधी देण्यात आली.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. १६) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. याशिवाय मुंबईतील ऍड. आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह अकरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 11 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत मंत्र्यांची नावे निश्‍चित केली होती.

भाजपकडून विदर्भातील डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, औरंगाबाद येथील अतुल सावे, सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर, विधान परिषद सदस्य तानाजी सावंत, रत्नागिरीचे उदय सामंत यांना शपथ देण्यात आली. 

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर

जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली.  मंत्री

 राधाकृष्ण विखे-पाटील

जयदत्त क्षीरसागर

आशीष शेलार

डॉ. संजय कुटे

सुरेश खाडे

डॉ. अनिल बोंडे

तानाजी सावंत

उदय सामंत

अविनाश महातेकर

संजय ऊर्फ बाळा भेगडे

योगेश सागर

शिवाजीराव नाईक 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...