सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांच्या क्षेत्रवाढीची शक्यता

जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचे २०२० पर्यंत निर्यात क्षेत्र वाढविण्याचा उद्देश आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. नवीन शेतकऱ्यांना नूतनीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे यंदा निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र वाढेल. - एस. डी. शिलेदार,कृषी अधिकारी, सांगली
Expected transport grape field expansion in Sangli district
Expected transport grape field expansion in Sangli district

सांगली : यंदा महापूर, अतिवृष्टीमुळे बदलत्या वातावरणाचा सामना करून शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविल्या आहेत. यंदाच्या द्राक्ष निर्यात हंगामासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. १ हजार ०४३ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे युरोपसह अन्य देशांत जाण्यास सज्ज झाली आहेत. नोंदणीची अंतिम मुदत डिसेंबरअखेर आहे. यामध्ये अजून वाढ होईल. त्यामुळे यंदा निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र वाढेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा द्राक्ष हंगामाच्या फळ छाटणीपासून अनेक अस्मानी संकटे आली. त्यावर मात करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्षबागा वाचविण्यात यश आले. खर्च मात्र दुप्पट झाला. जिल्ह्याचा द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे. 

देशांतर्गत बाजारपेठेप्रमाणे जिल्ह्यातील द्राक्षांना युरोप देशासह अन्य देशांतूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरवर्षी निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होते आहे. गेल्या वर्षी १ हजार ९५८ शेतकऱ्यांनी १०३० हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली. गतवर्षी जिल्ह्यातून अंदाजे १५ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात केली. 

या हंगामात द्राक्षांची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले परवाने नूतनीकरण केले. अनेक शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करून आपली द्राक्षे परदेशांत पाठवण्याची तयारी दर्शविली. प्रामुख्याने तासगाव, खानापूरतून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

तालुकानिहाय निर्यातक्षम द्राक्ष नोंदणी

तालुका नवीन नूतनीकरण शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर)
आटपाडी २४ ३३    १९.७५
जत  ३३ ३८  ३२.४
कडेगाव २७ ३१  १६.८७
कवठेमहांकाळ ५.९६
खानापूर  १४६  ५६९   ७१५ ३७१.९३
मिरज १४२  १५० २९२  ६७.३९
पलुस ९५ १४ १०९ ६६.४४
तासगाव ३१५ ३२३ ६३८ ३५३.४८
वाळवा १४  २१ ८.९१
एकूण  ७७०  १११६ १८८६  १०४३.१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com