नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारणावर २३ कोटींचा खर्च

नांदेड : तात्पुरती पूरक नळ योजना, तातडीची पाणीपुरवठा योजना, विहीर खोल करून गाळ काढणे आदीवर २३ कोटी १५ लाख रुपये खर्च झाला.
 Expenditure of 23 crores on scarcity alleviation in Nanded district
Expenditure of 23 crores on scarcity alleviation in Nanded district

नांदेड  : नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, तातडीची पाणीपुरवठा योजना, विहीर खोल करून गाळ काढणे आदीवर २३ कोटी १५ लाख रुपये खर्च झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून देण्यात आली.

यंदा उन्हाळी टंचाई उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यातील दहा गावे व सतरा वाड्यांवर २१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या सोबतच १४७ गावांमध्ये खाजगी विहीरी व कूपनलिकेचे अधिग्रहण करून नागरिकांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागासह काही नागरी वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. यासाठी प्रशासनाला टंचाई निवारणाच्या उपाययोजना करून नागरिकांना खासगी तसेच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ग्रामीण व नागरी भागात खासगी विंधन विहिरी, कूपनलिकेचे अधिग्रहण करून नागरिकांना, जनावरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात टंचाईची तीव्रता कमी स्वरूपात होती. मागील वर्षी ६२ टॅंकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यात आला. त्यावर ३५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता.

यंदा मात्र मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे टंचाईची स्थिती अधिक जाणवली नाही. उन्हाळ्याच्या शेवटी जिल्ह्यातील दहा गावे व १७ वाड्यांवर २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. या सोबतच १४५ ठिकाणी खाजगी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले. यासोबत २७४ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या.

तर, २८२ ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करण्यात आली. या सोबतच ९८२ ठिकाणी विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करण्यात आली. १०४ ठिकाणी तात्पुरती पूरक नळ योजना अथवा तातडीची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. 

दोन ठिकाणी विहीर खोलीकरण करण्याचे काम करण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात २६३ वाड्या व ८१५ गावात एक हजार ७३ उपाया योजना राबविण्यात आल्या. यासाठी जिल्ह्याला २३ कोटी १५ लाख रुपये खर्च झाला. यात नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी एक कोटी ७२ लाख योजनांची विशेष दुरुस्तीसाठी १३ कोटी १८ लाख, तात्पुरती पूरक नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी सात कोटी २१ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ लाख खाजगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ५२ लाख, विहीर खोली करण्यासाठी तीन लाख या प्रकारे खर्चाचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com