मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च, उत्पन्नाचे समीकरण जुळेना

अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे.
 Expenditure on grapes in Mathpimpalgaon-Golapangari, income equation did not match
Expenditure on grapes in Mathpimpalgaon-Golapangari, income equation did not match

अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे. मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांची द्राक्ष फळबाग लागवड करून मोठे उत्पन्न मिळविण्यासाठी दिवसरात्र धडपड सुरु आहे.

अनेकांना द्राक्ष फळबागांच्या लागवडीतून प्रेरणा मिळाली. यामुळे बठाण, गोलापांगरी, काजळा, आलमगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष फळबागेची लागवड झाली. शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलविल्या. मात्र जागतिक कोरोना महामारीचे संकट आल्याने व त्यापायी बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांना नुकसान सोसावे लागले. 

उत्पादकांना जाग्यावर ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भावात प्रचंड घसरण होऊन अखेर पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे द्राक्ष विक्री करावे लागली. अनेकांनी द्राक्ष फुकट वाटप केले. सुलतानी संकट, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, सततचा पाऊस यामुळे झालेले नुकसान सोसून अजूनही शेतकरी द्राक्ष फळबागेतून भरघोस उत्पन्न मिळेल, अशी आशा बाळगून आहे. 

यंदा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे आक्टोबरमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के केलेली छाटणी अखेर वाया गेली. उर्वरित काही ठिकाणी कमी प्रमाणात डोळे फुगवण झाली. त्यातून दहा ते वीस असे घड दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक द्राक्ष शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविण्यासाठी उधार उसनवारी केली. फळबागांसाठी उधारीवर घेतलेली खते, औषधांचे पैसे वसुल होतील की नाही हा प्रश्न आहे.

गत वर्षाच्या तुलनेत यंदा लवकर नियोजन केले होते. परंतु, या वर्षी जास्त प्रमाणात झाडांना पाणी पुरवठा झाला. त्यामुळे बागांना दहा ते वीस घडापेक्षा जास्त घड लगडले नाहीत. यामुळे उत्पन्नाची आशा मावळली आहे. - अरविंद मोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, गोलापांगरी

द्राक्ष फळबागेची सलग तीन वर्षांपासून जोपासना करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्च केला. पण, कोरोनामुळे अखेर होत्याचे नव्हते झाले. - कृष्णा उजाड, द्राक्ष उत्पादक, बठाण बु.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com