agriculture news in marathi Expenditure on grapes in Mathpimpalgaon-Golapangari, income equation did not match | Agrowon

मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च, उत्पन्नाचे समीकरण जुळेना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे.

अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे. मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांची द्राक्ष फळबाग लागवड करून मोठे उत्पन्न मिळविण्यासाठी दिवसरात्र धडपड सुरु आहे.

अनेकांना द्राक्ष फळबागांच्या लागवडीतून प्रेरणा मिळाली. यामुळे बठाण, गोलापांगरी, काजळा, आलमगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष फळबागेची लागवड झाली. शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलविल्या. मात्र जागतिक कोरोना महामारीचे संकट आल्याने व त्यापायी बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांना नुकसान सोसावे लागले. 

उत्पादकांना जाग्यावर ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भावात प्रचंड घसरण होऊन अखेर पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे द्राक्ष विक्री करावे लागली. अनेकांनी द्राक्ष फुकट वाटप केले. सुलतानी संकट, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, सततचा पाऊस यामुळे झालेले नुकसान सोसून अजूनही शेतकरी द्राक्ष फळबागेतून भरघोस उत्पन्न मिळेल, अशी आशा बाळगून आहे. 

यंदा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे आक्टोबरमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के केलेली छाटणी अखेर वाया गेली. उर्वरित काही ठिकाणी कमी प्रमाणात डोळे फुगवण झाली. त्यातून दहा ते वीस असे घड दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक द्राक्ष शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविण्यासाठी उधार उसनवारी केली. फळबागांसाठी उधारीवर घेतलेली खते, औषधांचे पैसे वसुल होतील की नाही हा प्रश्न आहे.

गत वर्षाच्या तुलनेत यंदा लवकर नियोजन केले होते. परंतु, या वर्षी जास्त प्रमाणात झाडांना पाणी पुरवठा झाला. त्यामुळे बागांना दहा ते वीस घडापेक्षा जास्त घड लगडले नाहीत. यामुळे उत्पन्नाची आशा मावळली आहे.
- अरविंद मोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, गोलापांगरी

द्राक्ष फळबागेची सलग तीन वर्षांपासून जोपासना करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्च केला. पण, कोरोनामुळे अखेर होत्याचे नव्हते झाले.
- कृष्णा उजाड, द्राक्ष उत्पादक, बठाण बु.
 


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...