नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च, उत्पन्नाचे समीकरण जुळेना
अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे.
अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील द्राक्ष उत्पादकांचा होणारा खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याचे चित्र आहे. मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांची द्राक्ष फळबाग लागवड करून मोठे उत्पन्न मिळविण्यासाठी दिवसरात्र धडपड सुरु आहे.
अनेकांना द्राक्ष फळबागांच्या लागवडीतून प्रेरणा मिळाली. यामुळे बठाण, गोलापांगरी, काजळा, आलमगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष फळबागेची लागवड झाली. शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलविल्या. मात्र जागतिक कोरोना महामारीचे संकट आल्याने व त्यापायी बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांना नुकसान सोसावे लागले.
उत्पादकांना जाग्यावर ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भावात प्रचंड घसरण होऊन अखेर पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे द्राक्ष विक्री करावे लागली. अनेकांनी द्राक्ष फुकट वाटप केले. सुलतानी संकट, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, सततचा पाऊस यामुळे झालेले नुकसान सोसून अजूनही शेतकरी द्राक्ष फळबागेतून भरघोस उत्पन्न मिळेल, अशी आशा बाळगून आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे आक्टोबरमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के केलेली छाटणी अखेर वाया गेली. उर्वरित काही ठिकाणी कमी प्रमाणात डोळे फुगवण झाली. त्यातून दहा ते वीस असे घड दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक द्राक्ष शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविण्यासाठी उधार उसनवारी केली. फळबागांसाठी उधारीवर घेतलेली खते, औषधांचे पैसे वसुल होतील की नाही हा प्रश्न आहे.
गत वर्षाच्या तुलनेत यंदा लवकर नियोजन केले होते. परंतु, या वर्षी जास्त प्रमाणात झाडांना पाणी पुरवठा झाला. त्यामुळे बागांना दहा ते वीस घडापेक्षा जास्त घड लगडले नाहीत. यामुळे उत्पन्नाची आशा मावळली आहे.
- अरविंद मोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, गोलापांगरी
द्राक्ष फळबागेची सलग तीन वर्षांपासून जोपासना करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्च केला. पण, कोरोनामुळे अखेर होत्याचे नव्हते झाले.
- कृष्णा उजाड, द्राक्ष उत्पादक, बठाण बु.
- 1 of 1024
- ››