Expenditure of Rs. 245 crore on fodder camps in Solapur
Expenditure of Rs. 245 crore on fodder camps in Solapur

सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी रुपये खर्च 

सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर गेल्या वर्षभरात छावण्या सुरू असलेल्या कालावधीत सुमारे २४५ कोटी २३ लाख रुपये खर्च झाले होते. त्यापोटी शासनाकडून १६९ कोटी ८५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यापैकी ५० कोटी ८९ लाख रुपयांची बिले छावणीचालकांना अदा करण्यात आली आहेत. पण, अद्यापही ७५ कोटी ३८ लाख रुपयांची येणे बाकी आहे. परंतु, मागचा अनुभव लक्षात घेता, छावणीचालकांच्या बिलांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यात वेळ चालल्याने बिले मिळण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येते. 

गेल्या वर्षभरात जवळपास सात महिने जनावरांच्या चाऱ्यासाठी या छावण्या सुरू राहिल्या. त्यात उत्तर सोलापूर तालुक्यास १९ लाख ६० हजारांपैकी १० लाख ९२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. बार्शी तालुक्यात २ कोटी ३९ लाख रुपयांपैकी १.३२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात २५ लाख ९९ हजारांपैकी २५.६४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ८ कोटी ९६ लाख रुपयांपैकी ७.६१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. माढा तालुक्यात १५ कोटी ३ लाख रुपयांपैकी १ कोटी ८० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

पंढरपूर तालुक्यात ३.९४ कोटीपैकी ३ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. मोहोळ तालुक्यात ३.३४ कोटी रुपयांपैकी ६३ लाख ९१ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ३५.१३ कोटीपैकी १४.१७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. सांगोला तालुक्यात ९४.३० कोटी रुपयांपैकी ३६.९६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यात ५ कोटी १८ लाख रुपयांपैकी ९९ लाख ५४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्राप्त अनुदानापैकी ५० कोटी ८९ लाख ९० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांची सोय व्हावी, यासाठी त्या-त्या तालुकास्तरावर निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्याच स्तरावर छावणीचालकांकडून सादर करण्यात आलेल्या बिलांची कसून तपासणी करूनच बिले अदा करण्यात येत आहेत. 

अगोदरची भ्रष्टाचाराची प्रकरणे न्यायालयात  पाच-सहा वर्षांपूर्वीही जिल्ह्यात दुष्काळात छावण्या सुरू केल्या होत्या. तेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. आजही या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणे न्यायालयातही आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्हा प्रशासनाने छावण्यांवर नियंत्रण ठेवले, पण आता बिले वाटप करतानाही त्याबाबत काळजी घेतली जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com