Agriculture news in marathi, expensive of cilantro, fenugreek seeds in Solapur | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या भावात सुधारणा

सुदर्शन सुतार
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक अगदीच कमी झाली. एकीकडे भाज्यांना मागणी वाढत असताना, दुसरीकडे आवक कमी होत राहिली. त्यामुळे संपूर्ण सप्ताहभर भाज्यांचे दर पुन्हा वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक अगदीच कमी झाली. एकीकडे भाज्यांना मागणी वाढत असताना, दुसरीकडे आवक कमी होत राहिली. त्यामुळे संपूर्ण सप्ताहभर भाज्यांचे दर पुन्हा वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भाज्यांची आवक मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या स्थानिक भागातून झाली. गेल्या महिनाभरापासून भाज्यांच्या  दरातील तेजी कायम आहे. या सप्ताहातही पुन्हा तीच परिस्थिती होती. आवक कमी आणि मागणी जास्त, यामुळे दर वधारलेले राहिले. मेथीची रोज २ ते ४ हजार पेंढ्या, शेपूची एक ते दोन हजार पेंढ्या आणि कोथिंबिरीची ५ ते ८ हजार पेंढ्या अशी आवक राहिली. पण या आवकेच्या तुलनेत दुपटीने भाज्यांना मागणी राहिली. 

कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १८०० रुपये, मेथीला ८०० ते १३०० रुपये आणि शेपूला ७०० ते १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकालाही मागणी वाढली. त्यांची आवकही अशीच होती. चुक्‍याला प्रति शंभर पेंढ्यांसाठी २५० ते ५०० रुपये आणि पालकाला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या दरात किंचित चढ-उतार वगळता, त्यांचे दरही काहीसे स्थिर होते. त्यात वांगी आणि हिरवी मिरचीची आवक प्रतिदिन २० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची आवक रोज ५०० क्विंटलपर्यंत राहिली.  

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलसाठी किमान  ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये, वांग्याला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये आणि टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर मिळाला. 

कांदा दरातही तेजी

कांद्याच्या आवकेत काहीशी घट झाली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिली. कांद्याची आवक जेमतेम रोज १० ते ३० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची आवक स्थानिक भागातून अगदीच नगण्य राहिली. बाहेरील जिल्ह्यातून ती अधिक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपयापर्यंत दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कांदा दरांवर खानदेशात दबावजळगाव  ः खानदेशात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
लिंबाला राज्यात प्रतिक्विंटल २०० ते...पुणे  ः  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न...
पुणे बाजार समितीत कांद्याची आवक... पुणे : ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...