कृत्रिम पावसाचे प्रयोग लांबणीवर

कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस

मुंबई : राज्यातला कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ३० जुलैऐवजी ८ ते ९ ऑगस्टचा मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत. कृत्रिम पावसासाठी फेब्रुवारी महिन्यात विमानाचे टेंडर देणे अपेक्षित होते. कर्नाटक सरकारने फेब्रुवारीमध्ये टेंडर दिल्याने महाराष्ट्रापेक्षा आधी कर्नाटकमध्ये प्रयोग सुरू झाला आहे.  गेल्या आठवड्यात सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत. त्या ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी कधी करावी, याचा अभ्यास सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरणे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात बसविण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्यछायेतील ढगांचा अभ्यास करीत आहेत. सी बँड रडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रडारमधून पर्जन्यछायेतील ढगांवर आडव्या आणि उभ्या लहरी सोडल्या जातात. या लहरी ढगांना भेदून जी माहिती देतात त्यावर आधारित कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होणार आहेत. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराइड किंवा कॅल्शियम क्लोराइड असे घटक फवारले जातात. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बसविलेल्या उपकरणांच्या साह्याने किमान दोनशे वेळा फवारणीचे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष मांडले जाणार आहेत. सोलापूर विमानतळावर दोन विमाने यासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्राथमिक अभ्यासामध्ये पर्जन्यछायेतील ढगांमध्ये पाऊस पडण्याएवढी क्षमता असल्याचे दिसून आले आहे. परंतु, अभ्यासाचे पूर्ण निष्कर्ष हाती यायला वेळ लागेल, असे सांगितले जाते. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा उपयोग करून कृत्रिम पावसासाठी पर्जन्यछायेच्या प्रदेशाची आलेली माहिती देशभरासाठी उपयोगी असणार आहे. पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोट ते कर्नाटकातील इंडीपर्यंत १२० पर्जन्यमापक यंत्रे बसविलेली आहेत. सोलापूरच्या ६५ किलोमीटर परिघात हे प्रयोग केले जात आहेत. हवा मोजण्यासाठी चार टॉवर या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.  तसेच, औरंगाबादमधील रडारच्या दोनशे किलोमीटर परिक्षेत्रातच कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत. यामुळे राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पूर्ण विदर्भात होणार नाही तसेच मराठवाड्यातील देखील काही भागांतच हा प्रयोग होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.  दरम्यान, कर्नाटकमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत. कर्नाटकचे विमान आले असून, महाराष्ट्रातील विमान २ किंवा ३ तारखेला पोचणार असल्याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर डीजीसीएच्या तपासणीला आणखी वेळ लागणार आहे. प्रत्यक्षात ८ ते ९ ऑगस्टला विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे आधी जाहीर झालेला ३० जुलैचा मुहूर्त ८ ते ९ ऑगस्टवर जाण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com