उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क निर्मितीचा प्रयोग 

गटाच्या माध्यमातून मुंबई, सुरत,पुणे आणि नाशिक शहरात दररोज दोन टनांपर्यंत भाजीपाला विक्रीस जातो. उत्पादन खर्च कमी करून महागड्या रसायनांच्या तुलनेत दशपर्णी अर्काचे चांगले परिणाम मिळत आहे. त्यामुळे यास आम्ही प्राधान्य देत आहोत. -गणेश चव्हाण, गटप्रमुख, श्री.श्री. सेंद्रिय फळे व भाजीपाला गट
dashparni ark
dashparni ark

नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री. सेंद्रिय फळे व भाजीपाला गट 'राष्ट्रीय शाश्वत सेंद्रिय शेती' प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. गटातील शेतकरी सामूहिक पातळीवर विविध प्रयोग करत असतात. वैयक्तिक पातळीवर दशपर्णी अर्क निर्मितीमध्ये अडचणी येत असल्याने सामूहिक पातळीवर गटातर्फे पाच हजार लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती करण्यात येत आहे. 

रासायनिक अवशेषमुक्त शेतमाल उत्पादन हा शेतकरी गटाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने गटाचे सदस्य आत्माराम पानगव्हाणे यांच्या शेतावरील जलकुंभात दशपर्णी अर्क द्रावण तयार करण्यात येत आहे. दशपर्णी अर्क निर्मितीसाठी कडूलिंब, सीताफळ, करंज, रुई, घाणेरी, गुळवेल अशा प्रकारच्या दहा झाडपाल्याचा वापर करण्यात येतो. तसेच गोमूत्र, मिरची, लसूण यांचे मिश्रण दशपर्णी अर्कात वापरले जाते. येत्या महिन्याभरामध्ये गटातील सदस्यांना माफक दरात दशपर्णी अर्काचे वितरण करण्यात येणार आहे. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क उपयुक्त असल्याचे गटातील सदस्यांचा अनुभव आहे. 

दशपर्णी अर्क निर्मिती प्रक्रियेदरम्यान निफाड कृषी अधिकारी बी.जी. पाटील, मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव, सागर खैरनार, उगांवचे कृषी सहाय्यक सुयोग धर्माधिकारी, कृषी पर्यवेक्षक श्री. गायमुखे, पंचायत समितीचे बाळसाहेब खेडकर यांसह गटाचे सदस्य उपस्थित होते.  प्रयोगाचे बदलते स्वरूप  गटामध्ये एकूण ५० सदस्य आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने दशपर्णी अर्क बनवला जात असे. आता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुधारित पद्धतीने अर्काची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी गटाला 'आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव यांचे सहकार्य मिळत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com