agriculture news in Marathi experiment of dashparni ark on social level Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क निर्मितीचा प्रयोग 

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

गटाच्या माध्यमातून मुंबई, सुरत,पुणे आणि नाशिक शहरात दररोज दोन टनांपर्यंत भाजीपाला विक्रीस जातो. उत्पादन खर्च कमी करून महागड्या रसायनांच्या तुलनेत दशपर्णी अर्काचे चांगले परिणाम मिळत आहे. त्यामुळे यास आम्ही प्राधान्य देत आहोत. 
-गणेश चव्हाण, गटप्रमुख, श्री.श्री. सेंद्रिय फळे व भाजीपाला गट 

नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री. सेंद्रिय फळे व भाजीपाला गट 'राष्ट्रीय शाश्वत सेंद्रिय शेती' प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. गटातील शेतकरी सामूहिक पातळीवर विविध प्रयोग करत असतात. वैयक्तिक पातळीवर दशपर्णी अर्क निर्मितीमध्ये अडचणी येत असल्याने सामूहिक पातळीवर गटातर्फे पाच हजार लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती करण्यात येत आहे. 

रासायनिक अवशेषमुक्त शेतमाल उत्पादन हा शेतकरी गटाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने गटाचे सदस्य आत्माराम पानगव्हाणे यांच्या शेतावरील जलकुंभात दशपर्णी अर्क द्रावण तयार करण्यात येत आहे. दशपर्णी अर्क निर्मितीसाठी कडूलिंब, सीताफळ, करंज, रुई, घाणेरी, गुळवेल अशा प्रकारच्या दहा झाडपाल्याचा वापर करण्यात येतो.

तसेच गोमूत्र, मिरची, लसूण यांचे मिश्रण दशपर्णी अर्कात वापरले जाते. येत्या महिन्याभरामध्ये गटातील सदस्यांना माफक दरात दशपर्णी अर्काचे वितरण करण्यात येणार आहे. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क उपयुक्त असल्याचे गटातील सदस्यांचा अनुभव आहे. 

दशपर्णी अर्क निर्मिती प्रक्रियेदरम्यान निफाड कृषी अधिकारी बी.जी. पाटील, मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव, सागर खैरनार, उगांवचे कृषी सहाय्यक सुयोग धर्माधिकारी, कृषी पर्यवेक्षक श्री. गायमुखे, पंचायत समितीचे बाळसाहेब खेडकर यांसह गटाचे सदस्य उपस्थित होते. 

प्रयोगाचे बदलते स्वरूप 
गटामध्ये एकूण ५० सदस्य आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने दशपर्णी अर्क बनवला जात असे. आता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुधारित पद्धतीने अर्काची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी गटाला 'आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव यांचे सहकार्य मिळत आहे. 
 


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...