Agriculture news in marathi Experiment of elegant fisheries in nine villages in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ गावात शोभिवंत मत्स्यपालनाचा प्रयोग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

रत्नागिरी : कांदळवनातून उपजीविकेचे 
साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ७२ गावांचा ‘मायक्रो प्लॅन’ तयार केला आहे. नऊ गावांत शोभिवंत मत्स्यपालन करण्यात येणार आहे. त्यात फिश, आक्सर, एन्जिल या मागणी असलेल्या माशांचे उत्पादन केले जाणार आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील हा पहिलाच उपक्रम आहे.

रत्नागिरी : कांदळवनातून उपजीविकेचे 
साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ७२ गावांचा ‘मायक्रो प्लॅन’ तयार केला आहे. नऊ गावांत शोभिवंत मत्स्यपालन करण्यात येणार आहे. त्यात फिश, आक्सर, एन्जिल या मागणी असलेल्या माशांचे उत्पादन केले जाणार आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील हा पहिलाच उपक्रम आहे.

किनारपट्टीवरील कांदळवने चक्रीवादळांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे मासे व खेकडे यांचा प्रजोत्पादन काळ कांदळवन संरक्षणात जातो. गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे कांदळवन धोक्यात आले आहेत. त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शासनाने कांदळवन राखीव वने म्हणून अधिसूचित केले आहे.

कांदळवनांचे संरक्षण करण्याबरोबरच उपजीविका निर्माण करण्यासाठी वन विभागामार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ७२ गावांचा प्लॅन तयार केला आहे. २३० गावांमध्ये कांदळवनाचे २,४३० हेक्टर क्षेत्र आहे. त्यात १,४३३ हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वन विभागाकडे वर्ग केले आहे.

किनारी गावांमध्ये खेकडापालन, बहुआयामी मत्स्यशेती, मधुमक्षिकापालन, शिंपलेपालन, गृहपर्यटन, शोभिवंत मत्स्यशेती, पर्यटन हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ७२ गावांमध्ये मंडणगड तालुक्यातील १२, दापोलीतील ७, खेडमधील ३, गुहागर १५, रत्नागिरी तालुक्यातील १९, चिपळूण तालुक्यातील ५, राजापूर ११ गावांचा समावेश आहे. या गावांत कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे स्थापन करण्यात आली आहे.

या गावांमधील ९ गावांमध्ये मत्स्यशेती केली जाईल. दापोली तालुक्यात ४, गुहागर १, रत्नागिरी ४ गावांमध्ये युनिट करण्यात येणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती केली जाणार आहे. प्रत्येक युनिटला ९ टँक देण्यात येणार आहेत. यामध्ये २ टँक साठवणुकीसाठी, तर ७ टँक मासेपालनासाठी असतील.

जिल्ह्यातील ६१ गावांच्या आराखड्याला जिल्हा समितीची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील हे या प्रकल्पाचे प्रमुख असतील. एक उपजीविका तज्ज्ञ, ८ प्रकल्प समन्वयक आहेत. त्यांच्यामार्फत हे उपक्रम राबविण्यात येतील.


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...