सोलापूर झेडपी अध्यक्षनिवडीत महाविकास आघाडीचा प्रयोग

Experiment in mahavikas aghadi in Solapur Zilla Parishad
Experiment in mahavikas aghadi in Solapur Zilla Parishad

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षनिवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापुरातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच बारामती येथे जाऊन भेट घेतली. त्यांना राजकीय परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे अध्यक्षनिवडीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या विजयी सत्कार सोहळ्यासाठी वेळ मिळावी, यासाठी माजी आमदार राजन पाटील यांनी बारामती येथे पवारांची भेट घेतली. या वेळी आमदार माने, राष्ट्रवादीचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, मोहोळ बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रेय पवार, निरंजन भूमकर उपस्थित होते. 

या भेटीत सत्कार सोहळ्यासोबतच संभाव्य अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा झाली. सर्वांना सोबत घेऊन जाणारा अध्यक्ष निवडा, असे सांगताना आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. 

जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी समविचारी आणि भाजप एकवटले आहेत. दुसरीकडे या गटाच्याही बैठका सुरू असून, नागपूर दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यासंबंधी बैठक घेणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर अध्यक्ष झाले; पण सध्या ते अपक्ष आमदार आहेत. शिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेले आहेत. त्यामुळे नव्या निवडीला महत्त्व आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com