Agriculture News in Marathi Experiment of Potato Cultivation on Turkmenabad Kharadi Agreement | Page 2 ||| Agrowon

तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा लागवडीचा प्रयोग 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील तुर्कांबाद खराडी येथील स्वयंभू शेतकरी गट आणि भीमाशंकर ॲग्रो कंपनी आंबेगावच्या माध्यमातून करारावर बटाटा शेतीचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील तुर्कांबाद खराडी येथील स्वयंभू शेतकरी गट आणि भीमाशंकर ॲग्रो कंपनी आंबेगावच्या माध्यमातून करारावर बटाटा शेतीचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. जवळपास १५ एकरांवरील या प्रयोगात २० शेतकरी सहभागी झाले आहेत. लागवड केलेले पीक आता बहरू पाहत आहे. 

साधारणत: ऑक्‍टोबरच्या शेवटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहभागी शेतकऱ्यांपैकी १८ शेतकऱ्यांनी बेड पद्धतीने दोन ओळींतील अंतर अडीच फूट व दोन रोपातील अंतर सहा इंच ठेवून बटाटा पिकाची लागवड केली. तर दोन शेतकऱ्यांनी जोडओळ पद्धतीने लागवडीचा पर्याय निवडत दोन जोडओळीतील अंतर एक फूट व दोन रोपातील अंतर सहा इंच ठेवून बटाटा लागवड केली. 

गंगापूर तालुक्‍यात तुर्काबाद खराडी परिसरातील हा करार पद्धतीने बटाटा लागवडीचा हा प्रयोग असल्याचे ‘आत्मा’च्या वतीने सांगण्यात आले. एक एकर बटाटा लागवडीसाठी साधारणत: ८ क्‍विंटल बेणे लागले जे २६०० रुपये प्रतिक्‍विंटलने करार करणाऱ्या पेप्सीको कंपनीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांची किटही कंपनीकडून पुरविली जाणार आहे. शिवाय उत्पादित बटाटा १४ रुपये प्रतिकिलोने कंपनीच खरेदी करणार असल्याची माहिती स्वयंभू शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदीश पाटेकर यांनी दिली. या प्रयोगात सहभागी केलेल्या क्षेत्रातून एकरी किमान १२० क्‍विंटल बटाटा उत्पादन होणे अपेक्षीत असून चिप्स बनविण्यासाठी त्याचा कंपनीकडून वापर केला जाणार असल्याचेही श्री. पाटेकर म्हणाले. 

या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे, चंद्रकांत तायडे, शिरोडीचे पोलिस पाटील तसेच स्वयंभू शेतकरी गटाचे अध्यक्ष जगदीश पाटेकर व शेतकरी प्रयत्नशील आहेत. 

प्रतिक्रिया
शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणानुसार तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकरी गटांचे कंपनी सोबत करार करण्यात येत आहेत. यामध्ये भेंडी, बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न, बटाटे असे करार सध्या गंगापूर तालुक्यात आत्माच्या प्रयत्नातून सुरू आहेत. भविष्यात याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव आणि विक्रीमध्ये फायदा होईल 
- दिलीप मोटे, 
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, गंगापूर 


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...