Agriculture news in marathi; Experiment with river plow at Satpuda | Agrowon

नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विविध संस्था, कारखाने यांच्या सहकार्याने नदी नांगरणीचे काम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. 

सातपुडा पर्वतालगत शहादा (जि. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) व जळगाव तालुक्‍यातील रावेर, यावल आणि चोपडा हे तालुके आहेत. यातील शहादा, शिरपूर, यावल व रावेरात जलसंधारणाची अनेक कामे मागील चार-पाच महिन्यांत करण्यात आली. 

जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विविध संस्था, कारखाने यांच्या सहकार्याने नदी नांगरणीचे काम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. 

सातपुडा पर्वतालगत शहादा (जि. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) व जळगाव तालुक्‍यातील रावेर, यावल आणि चोपडा हे तालुके आहेत. यातील शहादा, शिरपूर, यावल व रावेरात जलसंधारणाची अनेक कामे मागील चार-पाच महिन्यांत करण्यात आली. 

शहादा तालुक्‍यातील सुमारे ५०-६० गावांची जीवनवाहिनी असलेल्या गोमाई नदीची नांगरणी पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्यातर्फे करण्यात आली. नदीत अनेक ठिकाणी मातीचा मोठा, जाड थर तयार झाला आहे. यामुळे नदीतून पाणी वाहून जाते. ते जिरत नाही. परिणामी नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे हवे तसे पुनर्भरण होत नाही. ही बाब लक्षात घेता नदी नांगरणीचे काम या भागात सुरू झाले. या अंतर्गत लोणखेडा ते मलोनी या गावांदरम्यान नदीची नांगरणी करण्यात आली. त्यात अधिक अश्‍वशक्तीचे ट्रॅक्‍टर, जेसीबी, पोकलेन मशिनचा उपयोग माती काढण्यासाठी करण्यात आला. ठिकठिकाणी लहान वाळूचे बंधारेदेखील तयार करण्यात आले. कामाची सुरवात कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते झाली.

यावल, रावेर तालुक्‍यातील सुकी, भोकरी, भोनक आदी नद्यांमध्येदेखील नांगरणी किंवा जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सावदा (ता. रावेर) येथील स्वामिनारायण गुरुकुल, महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, आमदार हरिभाऊ जावळे व इतर संस्थांनी पुढाकार घेतला. किनगाव (ता. यावल) नजीकच्या भोनक नदीमध्ये मातीचे थर दूर करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी वाळूचे बंधारे तयार केले. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नद्यांमध्ये पाणी जिरविण्याची मोठी क्षमता असून, जलसंधारणाच्या कामांमुळे पुढील वर्षी या भागातील जलपातळी वाढू शकेल. जोरदार पावसाची प्रतीक्षा या भागातील शेतकरी करीत आहेत. 

News Item ID: 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...