मालेगावात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणार ः आरोग्यमंत्री टोपे 

मालेगाव, जि. नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
Expert doctors to be appointed in Malegaon: Health Minister Tope
Expert doctors to be appointed in Malegaon: Health Minister Tope

मालेगाव, जि. नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. 

मालेगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, आवश्यक उपाययोजनांच्या आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, आरोग्य उपसंचालक पठाण शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

मंत्री श्री. टोपे म्हणाले, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनसाठी आवश्यक सोयीसुविधांमध्ये स्वच्छ पाणी व पोषक आहार, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक व त्यांच्यासाठी लागणाऱ्या पीपीई कीट व पुरेशा औषधांसाठा या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. नाशिकमध्ये तपासणी लॅब कार्यान्वित झाल्यामुळे २४ तासांत अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांवर तात्काळ उपचार मिळतील. परिणामी रुग्णांची घरवापसी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलिस प्रशासनातील काही पोलिस कर्मचारी कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत. त्याचबरोबर काही डॉक्टर देखील रुग्णांची सेवा करताना बाधित झाले आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. विषाणूसारख्या महामारीला थोपविण्यासाठी नागरिकांचे देखील सहकार्य गरजेचे असून एकजुटीने कोरोनाला हरवू या, असे भावनिक आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले. 

खासगी डॉक्टरांनी सेवा सुरू करावी, अन्यथा कारवाई  मालेगाव शहरात जवळपास १५० खासगी रुग्णालये आहेत. ती तात्काळ सुरू करावी. सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होणार नाही, यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी त्यांच्या ओपीडी तात्काळ कार्यान्वित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com