वैजापूर येथे तज्ज्ञांकडून लष्करी अळीची पाहणी

वैजापूर येथे तज्ज्ञांकडून लष्करी अळीची पाहणी
वैजापूर येथे तज्ज्ञांकडून लष्करी अळीची पाहणी

औरंगाबाद : मका पिकावरील लष्करी अळीच्या (फॉल आर्मी वर्म) आक्रमणाची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गुरुवारी (ता. २७) पाहणी केली. पाऊस हा अळीच्या नियंत्रणात हातभार लावेल. मात्र त्यावरच विसंबून न राहता करावयाच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या लोणी बु. व सवंदगाव शिवारातील मका पिकावर फॉल आर्मी वर्म अर्थात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले होते. हा धोका विस्तारू नये, यासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या, यासाठी शेतकरी व कृषी विभागाच्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, कृषी विभागातर्फे  गुरुवारी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पाहणी केली.  

औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार यांच्या नेतृत्वात कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. गजेंद्र जगताप यांच्या शास्त्रज्ञांमध्ये समावेश होता. कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी गुरुवारी तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी, मंडळ कृषी अधिकारी एम. एच. घोडके, कृषी पर्यवेक्षक के. एम. घुगरकर, कृषी सहायक एस.बी. राजपूत यांनी लोणी बु. शिवारातील अर्जुन गुंजाळ, साहेबराव जाधव यांच्या शेतातील प्रादुर्भावग्रस्त मका पिकाची पाहणी केली. या पाहणीत बीज प्रक्रिया न केलेल्या बियाण्याचा वापर पेरणीसाठी केल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले. 

शेतकऱ्यांनी मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिक सजगपणे पिकाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज  डॉ. पवार यांनी व्यक्‍त केली. कीटकशास्त्रज्ञ डॉ. पतंगे यांनी प्रादुर्भावाचा परिणाम, अळ्यांची अवस्था, पाऊस लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.  वैजापूर तालुक्‍यात जवळपास ३० हजार हेक्‍टरवर मक्याचे क्षेत्र असते. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा वापर केल्यास लागवडीनंतर सुमारे २० दिवसांपर्यंत मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत नाही. शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करूनच मक्याची पेरणी करावी, असा सल्ला कुलकर्णी यांनी दिला. या वेळी लोणी बु.चे सरपंच गणेश इंगळे, शेतकरी भगवान इंगळे, नारायण जाधव, आदींची उपस्थिती होती. 

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय

    शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करा, पिकात पक्षिथांबे उभारा, पिकाचे निरीक्षण करताना आढळून आलेल्या मोठ्या अळ्या नष्ट करा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com