agriculture news in marathi, experts says, dont panic over boll worm attack, Maharashtra | Agrowon

बोंडअळीप्रश्नी शेतकऱ्यांनी घाबरू नये ः तज्ज्ञ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

खेडी खुर्द येथील शिवारातील शेतात आढळलेली गुलाबी बोंड अळीच आहे. अजून अनेक ठिकाणी पतंग आढळले आहेत. परंतु नुकसानीची पातळी किती आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ.संजीव पाटील, कापूस पैदासकार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (जळगाव केंद्र).

जळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाचे पीक ६० दिवसांचे होत आलेले असतानाच काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळीच्या उत्पत्तीस कारणीभूत पतंग आढळले आहेत. त्यांची संख्या आटोक्‍यात आणता येईल. नुकसानीची टक्केवारी किती आहे हे स्पष्ट झालेले नाही. शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

जिल्ह्यातील खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकरी शशिकांत डिगंबर पाटील यांच्या २४ मे रोजी लागवड केलेल्या कापसाच्या पिकात फिकट गुलाबी, लालसर अळी आढळली आहे. या अळीचे चित्रण व छायाचित्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविले असता त्यांनी ही गुलाबी बोंड अळी असल्याचे स्पष्ट केले आहे.

परंतु प्रादुर्भाव अजूनही मोठा नाही, तर भडगाव (जि.जळगाव) तालुक्‍यात पूर्वहंगामी कापसाच्या शेतात गुलाबी बोंड अळीसंबंधीचे पतंग आढळले. कापसाचे पीक अजून ७० दिवसाचे झालेले नाही. पतंग दरवर्षी जुलैत आढळतात. नुकसानीची पातळी किती आहे हे स्पष्ट नाही. ते पाहण्यासाठी कामगंध सापळे लावले पाहिजेत. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कृषी विभाग म्हणतो, अमळनेरात अधिक समस्या
कृषी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्‍यातील सात गावांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. तसेच काही जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्येही ही समस्या असून कामगंध सापळे लावण्याचे आवाहन संबंधित शेतकरी, जिनर्सना केल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात भडगाव, अमळनेर, जळगाव इतर तालुक्‍यांमधील २२ ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे. ती २२ गावे कोणती याचा खुलासा मात्र केलेला नाही.

प्रतिक्रिया
माझ्या शेतात पूर्वहंगामी कापसाच्या पिकात फुलामध्ये फिकट गुलाबी व लालसर अळी लवकर दिसू लागली आहे.
- शशीकांत डिगंबर पाटील, कापूस उत्पादक, खेडी खुर्द, ता.जळगाव


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....