औरंगाबाद येथे जैवसमृध्द बाजरी वाणांच्या प्रसाराबाबत तज्ज्ञांचे चिंतन

येत्या वर्षभरात आमच्या प्रक्षेत्रावर फळपिके भाजीपाला रोपवाटिका उभी केली जाईल. मलबेरीच्या वेगवेगळ्या जातीची प्रात्यक्षिके ‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रावर घेण्याची तयारी आम्ही करत आहोत. - डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, औरंगाबाद.
Experts worry about the spread of bio-rich millet varieties in Aurangabad
Experts worry about the spread of bio-rich millet varieties in Aurangabad

औरंगाबाद : एएचबी -१२०० व एएचबी -१२६९ या दोन्ही जैवसमृध्द बाजरी वाणांचा प्रसार मोठ्या प्रमाणात करणे, मक्‍याच्या पोंग्यात टाकण्यात येणाऱ्या कीटकनाशकांचा उर्वरित परिणाम किती दिवस राहतो, त्याचा पुढच्या पिकावर होणाऱ्या परिणामांना कसे नियंत्रित करता येईल, याविषयी काय संशोधन करता येईल, यावर चिंतन होईल. लोह व जस्त याची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना घेऊन त्यांना एएचबी-१२०० ही जैवसमृद्ध बाजरी सतत आहारात देऊन याचा त्यांच्या कमतरतेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्‍त केली गेली. 

येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात मंगळवारी (ता. ४) वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक झाली. कृषी विज्ञान केंद्राद्वारे व कृषी विभागाच्या समन्वयातून येत्या वर्षभरात करावयाच्या कार्याची आखणी करण्यात आली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपसंचालक रेशीम दिलीप हाके, फिशरीचे सहायक आयुक्‍त परवेज, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे आदी उपस्थित होते. 

मक्‍यात तणनाशकाचा होणारा अतिवापर व त्याचे दुष्परिणामानाचा अभ्यास करून ते थांबविण्यावर मार्गदर्शक सूचना पुरविणे, शेतकऱ्यांना सोबत घेऊन मका उत्पादनाच्या  प्रमाणात मुरघासचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, कृषिमित्रांद्वारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

रेशीम विभागातर्फे मलबरेची वेगवेगळ्या जातींची प्रात्यक्षिके कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर घ्यावी. कोणती जात रेशीमसाठी जास्त उपयुक्‍त आहे, यासह रेशीम प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com