सागंली जिल्ह्यातून १८ हजार टन द्राक्षाची निर्यात

सागंली : निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम मध्यावर असतानाच जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आला. त्यामुळे जगाची नाकेबंदी केली. त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्षालाही बसला. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम संपला असून यंदाच्या हंगामातील द्राक्षे १ हजार ३३८ कंटेनर म्हणजे १८ हजार २५३ टन जगात विक्री झाली. कोरोनाच्या काळात सुमारे ४० टक्के द्राक्ष परदेशात पोहोचली. यंदा संकटाची मालिका असून देखील गतवर्षीपेक्षा ३ हजार २८४ टन द्राक्षे युरोपसह इतर देशात ग्राहकांना चव चाखण्यास मिळाली.
Export of 18,000 tons of grapes from Saganli district

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू होती. त्यामुळे द्राक्षे बाजारपेठेत उशिरा आली. मुळात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातून परदेशात द्राक्षाची निर्यात होते. जिल्ह्यातून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाची निर्यात सुरू झाली असून २१ मार्चपर्यंत परदेशात द्राक्ष जात होती. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला.

त्याचबरोबर निर्यातही बंद करण्यात आली. त्यामुळे चार ते पाच दिवस निर्यात बंद होती. त्यानंतर केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी परवानगी दिल्याने पुन्हा द्राक्षाची निर्यात सुरू झाली. परंतु गतवर्षी ११३१ कंटेनर युरोप आणि इतर परदेशात द्राक्षाची निर्यात झाली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाची निर्यात कमी होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, संकटावर मात करून गतवर्षीपेक्षा या हंगामात २०७ कंटेनर म्हणजे ३ हजार २८४ टनाने अधिक निर्यात झाली आहे.

पन्नास टक्क्यांनी दर कमी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी निर्यातक्षम द्राक्षाचे दर प्रति किलोस ९० ते ११० रुपये असा मिळत होता. त्यानंतर ४० ते ५० रुपये असा दर झाला. म्हणजे ५० ते ६० रुपये प्रति किलोने दर कमी झाला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात २१३५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली होती. लॉकडाऊनच्या काळात द्राक्षे परदेशात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु यातून मार्ग मिळाल्याने निर्यात करण्यात यश आले आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षात द्राक्षाची निर्यातीचा आकडा चांगला आहे. - डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी, (निर्यात) सांगली

सांगलीतून वर्षनिहाय निर्यात झालेली द्राक्षे वर्ष...कंटेनर...टन २०१६-१७...७३६...८८८७ २०१७-१८...९१३...१०६०० २०१८-१९...११३१...१४९६९ २०१९-२०...१३३८...१८२५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com