Agriculture news in Marathi Export of 18,000 tons of grapes from Saganli district | Page 2 ||| Agrowon

सागंली जिल्ह्यातून १८ हजार टन द्राक्षाची निर्यात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

सागंली : निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम मध्यावर असतानाच जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आला. त्यामुळे जगाची नाकेबंदी केली. त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्षालाही बसला. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम संपला असून यंदाच्या हंगामातील द्राक्षे १ हजार ३३८ कंटेनर म्हणजे १८ हजार २५३ टन जगात विक्री झाली. कोरोनाच्या काळात सुमारे ४० टक्के द्राक्ष परदेशात पोहोचली. यंदा संकटाची मालिका असून देखील गतवर्षीपेक्षा ३ हजार २८४ टन द्राक्षे युरोपसह इतर देशात ग्राहकांना चव चाखण्यास मिळाली.

सागंली : निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम मध्यावर असतानाच जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आला. त्यामुळे जगाची नाकेबंदी केली. त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्षालाही बसला. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम संपला असून यंदाच्या हंगामातील द्राक्षे १ हजार ३३८ कंटेनर म्हणजे १८ हजार २५३ टन जगात विक्री झाली. कोरोनाच्या काळात सुमारे ४० टक्के द्राक्ष परदेशात पोहोचली. यंदा संकटाची मालिका असून देखील गतवर्षीपेक्षा ३ हजार २८४ टन द्राक्षे युरोपसह इतर देशात ग्राहकांना चव चाखण्यास मिळाली.

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू होती. त्यामुळे द्राक्षे बाजारपेठेत उशिरा आली. मुळात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातून परदेशात द्राक्षाची निर्यात होते. जिल्ह्यातून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाची निर्यात सुरू झाली असून २१ मार्चपर्यंत परदेशात द्राक्ष जात होती. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला.

त्याचबरोबर निर्यातही बंद करण्यात आली. त्यामुळे चार ते पाच दिवस निर्यात बंद होती. त्यानंतर केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी परवानगी दिल्याने पुन्हा द्राक्षाची निर्यात सुरू झाली. परंतु गतवर्षी ११३१ कंटेनर युरोप आणि इतर परदेशात द्राक्षाची निर्यात झाली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाची निर्यात कमी होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, संकटावर मात करून गतवर्षीपेक्षा या हंगामात २०७ कंटेनर म्हणजे ३ हजार २८४ टनाने अधिक निर्यात झाली आहे.

पन्नास टक्क्यांनी दर कमी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी निर्यातक्षम द्राक्षाचे दर प्रति किलोस ९० ते ११० रुपये असा मिळत होता. त्यानंतर ४० ते ५० रुपये असा दर झाला. म्हणजे ५० ते ६० रुपये प्रति किलोने दर कमी झाला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात २१३५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली होती. लॉकडाऊनच्या काळात द्राक्षे परदेशात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु यातून मार्ग मिळाल्याने निर्यात करण्यात यश आले आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षात द्राक्षाची निर्यातीचा आकडा चांगला आहे.
- डी. एस. शिलेदार,
कृषी अधिकारी, (निर्यात) सांगली

सांगलीतून वर्षनिहाय निर्यात झालेली द्राक्षे
वर्ष...कंटेनर...टन
२०१६-१७...७३६...८८८७
२०१७-१८...९१३...१०६००
२०१८-१९...११३१...१४९६९
२०१९-२०...१३३८...१८२५३

 


इतर अॅग्रो विशेष
नागपूर जिल्हा परिषद बांधणार...नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला शहरात बाजारपेठ...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
पुनर्भरणावर भर अन् उपशावर हवे नियंत्रण मागील पावसाळ्यात महाराष्ट्राच्या बहुतांश...
उपलब्ध पाणी शेतापर्यंत पोहोचवामराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे...
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतील...नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने कृषी...
सर्वोच्च न्यायालय सांगेपर्यंत समितीचे...पुणे : देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या...
खेडा खरेदीत कापूसदरात वाढजळगाव ः कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून,...
आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! नाशिक ः आता हे संकटाचं सलग तिसरं वर्ष. नोटाबंदी,...
शेतीप्रश्‍न सोडविण्याची केंद्राची इच्छा...नगर ः दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र...
हापूस आंब्यावर काळे डाग सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस...
रावेरीमध्ये होणार सातवे शेतकरी साहित्य...पुणे ः साहित्यिकांच्या शेतीअर्थशास्त्र व...
सरपंच, सदस्यपदाचे लिलाव भोवणार; अशा...नाशिक : जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि...
तुतीला ‘कृषी पीक’ म्हणून मान्यता औरंगाबाद : रेशीम उद्योगातील तुतीला अखेर ‘कृषी पीक...
ग्रामपंचायतीसाठी आज मतदान नगर : गाव पातळीवरील राजकारणाला अन्यन्य महत्त्व...
रिक्त जागांचे प्रवेश आता...पुणे : कृषी पदवी प्रवेशाच्या सर्व फेऱ्या...
विदर्भात थंडी वाढली पुणे ः विदर्भाच्या दिशेने उत्तरेकडील थंड वारे...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना...मुंबई : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्‍यातील...
खानदेशात ९० टक्के केळीची काढणी पूर्णजळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९०...