Agriculture news in Marathi Export of Dragon Fruit produced in India to London | Agrowon

भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची लंडनमध्ये निर्यात

मुकूंद पिंगळे
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

‘अपेडा’च्या माध्यमातून नुकतीच गुजरातमधून लंडन येथे, तर पश्‍चिम बंगालमधून किंगडम ऑफ बहरिन येथे मंगळवारी (ता. ३) प्रायोगिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली आहे.

नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून ड्रॅगन फ्रूटच्या देशभरात लागवडी वाढल्या आहेत. औषधी गुणधर्मामुळे मागणी असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल आहे. आता भारतात पिकणाऱ्या या फळाला लंडनचे मार्केट खुणावत आहे. ‘अपेडा’च्या माध्यमातून नुकतीच गुजरातमधून लंडन येथे, तर पश्‍चिम बंगालमधून किंगडम ऑफ बहरिन येथे मंगळवारी (ता. ३) प्रायोगिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली आहे.

ड्रॅगन फ्रूट हे निवडुंग प्रकारातील वेल वनस्पतीचे फळ आहे. या फळाचे मूळ हे कटिबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील आहे. सध्या देशभरात ५ हजार हेक्टरवर लागवडी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर घेतले जाते. तर अलीकडे पश्‍चिम बंगालमध्ये लागवडी होऊ लागल्या आहेत. तर महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, नाशिकसह इतर जिल्ह्यांत लागवडी वाढत्या आहेत.  

बाहेरून लाल रंग आतून पांढरा गर तसेच बाहेरून लाल रंग आतून लाल गर या दोन प्रकारांत बाजारपेठेत हे फळ आढळून येते. मधुमेह, संधिवात आदींवर प्रभावी तर शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तंतुमय घटकांमुळे अन्नपचन शक्ती वाढवते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्धतेमुळे ग्राहकांकडून मागणी असल्याने त्यास चांगले दर मिळत आहेत. यापूर्वी मागणी असल्याने इतर उत्पादक देशांमधून आयात केली जात होती. मात्र आता देशात लागवड वाढल्याने बाजारपेठ त्यास मिळत आहे.

 निर्यातीसाठी ‘अपेडा’कडून प्रयत्न सुरू 
गत जून महिन्यात देशातून पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील तडसर येथून दुबईमध्ये निर्यात करण्यात आली होती. निर्यातमूल्य मिळत असल्याने सध्या अपेडाच्या माध्यमातून निर्यातवाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची उभारणी, गुणवत्ता विकास व बाजारपेठ विकास साधण्यात येत आहे. गुजरात सरकारने अलीकडेच या फळास ‘कमलम’ असे नामकरण केल्याने ‘अपेडा’कडून त्यानुसार प्रसिद्धी करण्यात येत आहे.

देशाच्या एकूण मागणीच्या तुलनेत ७ टक्के उत्पादन आहे. अद्याप ९३ टक्के त्यात तूट आहे. मात्र यानिमित्ताने बाजारपेठेचा एक स्रोत निर्माण झाला. त्या माध्यमातून नवी बाजारपेठ मिळाली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. 
- आनंद पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन

अगोदर ड्रॅगन फ्रूटची इतर देशांमधून आयात केली जात होती. मात्र, आता आपल्या देशातच लागवडी वाढल्या आहेत. येथे उत्पादित फळास दरही चांगले मिळत आहे. मात्र, शेतकरी निर्यातीसाठीच प्रयत्न करीत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने भारतात उत्पादित फळांच्या ब्रँडिंगवर भर देत आहोत. 
- प्रशांत वाघमारे,  उपसरव्यवस्थापक, अपेडा, मुंबई विभागीय कार्यालय


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...