निर्यातक्षम द्राक्ष बागांचे क्षेत्र वाढीचा अंदाज 

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या बाजारपेठेमुळे द्राक्ष उत्पादक संकटाचा सामना करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक चालू वर्षीच्या हंगामासाठी पुन्हा जिद्दीने सामोरे जात शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.
Export growth of exportable vineyards
Export growth of exportable vineyards

नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या बाजारपेठेमुळे द्राक्ष उत्पादक संकटाचा सामना करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक चालू वर्षीच्या हंगामासाठी पुन्हा जिद्दीने सामोरे जात शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. हंगामातील बहर छाटण्या चालू वर्षी टप्प्याटप्प्याने झाल्या असून, त्या अंतिम टप्प्यात आहेत. उत्पादनाच्या अंगाने नियोजन करण्यात आल्याने चालू वर्षी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीत ४० हजार बागांची नोंदणी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  देशातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी ८१ टक्के, तर ९१ टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. मात्र गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या कडक लॉकडाउनमुळे द्राक्षांची मागणी पुरवठा साखळी अडचणीत सापडली होती. पुढील २०२०-२१च्या हंगामात द्राक्ष उत्पादकांनी सप्टेंबरपासून कामकाज सुरू करत २० ऑक्टोबरपर्यंत ९० छाटण्या पूर्ण केल्या आहेत. तर नोव्हेंबरमधील छाटण्या ५ ते १० टक्केच झाल्या. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यांत मागणीच्या तुलनेत अधिक माल बाजारात आल्याने परिणामी दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल झालेला नाही. या सर्व अडचणी अभ्यासून शेतकऱ्यांनी चालू वर्षी ‘उत्पादन ते काढणी’ असे नियोजन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पुरवठा संतुलित राहील, अशी परिस्थिती आहे. 

‘ग्रेपनेट’वर ३३३ प्लॉटची नोंद  ऑक्टोबर गोडी बहर छाटण्या झाल्यानंतर ग्रेपनेट प्रणालीत निर्यातक्षम बागांची नोंदणी सुरू होते. हे कामकाज १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू असते. चालू वर्षी जिल्ह्यात ३३३ प्लॉटची नोंदणी झाली असून, नोव्हेंबर अखेर ४० हजारांच्या जवळपास नोंदणी अपेक्षित असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षीच्या हंगामाचा आढावा घेतल्यास द्राक्ष निर्यात वाढत असल्याचे दिसून येते. चालू वर्षी शेतकऱ्यांनी समस्यांचा वेध घेऊन कामकाज आखल्याचे दिसून येते. त्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे कामकाज टप्प्याटप्प्याने झाले आहे. त्यामुळे चालू वर्षी ग्रेपनेट प्रणालीत द्राक्ष बागांसह क्षेत्रात वाढ होऊन निर्यातीचा टक्का वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील द्राक्ष शेती दृष्टिक्षेपात :  नाशिक जिल्ह्यातील लागवड क्षेत्र...५८३६७.४३० हेक्टर  प्रमुख वाणांच्या लागवडी... थॉमसन सीडलेस, शरद सीडलेस, फ्लेम सीडलेस, सोनाका, तास-ए-गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी, क्लोन-२  (स्रोत : कृषी विभाग)  मागील वर्षांतील निर्यातीची स्थिती:  ग्रेपनेट द्राक्ष प्लॉट नोंदणी..८५७  द्राक्ष प्लॉट नोंदणी क्षेत्र (हेक्टर)...०५५  नोंदणी केलेले तालुके संख्या....१३  निर्यात (टन)...५९६  प्रतिक्रिया  गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान कमी आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही अंशी नुकसान आहेच, मात्र तुलनेने कमी आहे. चालू वर्षी कंटेनर व वाहतूक भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे हा फटका असेल. मात्र गुणवत्ता असल्याने निर्यात वाढेल.  - कैलास भोसले, उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. 

पहिल्या टप्प्यात माल निघण्यात अडचणी आल्या मात्र नुकसान फारसे झाले नाही. मात्र वातावरण अनुकूल असल्याने उत्पादन वाढ होणार आहे. त्यात निर्यातक्षम माल अधिक असल्याने ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी वाढ होणार आहे. माल टप्प्याटप्प्याने निर्यातीसाठी उपलब्ध होणार आहे.  -सुरेश कळमकर, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, मोहाडी, ता. दिंडोरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com