गूळ पावडरची अमेरिकेला निर्यात 

राज्य शासनच्या वतीने कृषी उद्योजकतेसाठी स्टार्टअप असलेल्या मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत ४ टन गूळ पावडर अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे.
jagery powder export
jagery powder export

पुणे ः राज्य शासनच्या वतीने कृषी उद्योजकतेसाठी स्टार्टअप असलेल्या मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत ४ टन गूळ पावडर अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे. अक्षय गायकवाड (रा. दौंड) येथील तरुण उद्योजकाच्या प्रयत्नाने निर्यात शक्य झाली आहे. गूळ पावडरच्या निर्यातीमधून जागतिक बाजारपेठ खुली होण्यास संधी निर्माण झाल्या आहेत. ‘अपेडा’चे सचिव डॉ. सुधांशू यांच्‍या हस्ते कंटेनरला झेंडा दाखवून निर्यातीला प्रारंभ झाला. 

अक्षय गायकवाड या तरुण उद्योजकाने अल्टिमा ॲग्रोजेनिक्स या उद्योगाच्या माध्यमातून विविध चवींच्या रसायनमुक्त गूळ पावडरची निर्मिती केली. याचे विपणन पुणे, मुंबई येथे करण्यात येत होते. स्थानिक बाजारपेठेसह निर्यातीसाठी देखील प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी कृषी उपसंचालक विजय कानडे, ‘अपेडा’चे सहायक सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांच्या सहकार्याने निर्यात करण्यात आली. यासाठी लागणारे विविध चाचण्या आणि परवाने देखील उपलब्ध करून देण्यात आले. विविध चवींच्या गूळ पावडरचे ‘गुड है’ या ब्रॅण्डच्या नावाने निर्यातीला प्रारंभ झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com