बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा

निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर ४०० हून अधिक तर बांगलादेश, नेपाळ व भुतानच्या सीमेवर ७०० ट्रक कांदा अडकून पडला होता.
Onion
Onion

नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर ४०० हून अधिक तर बांगलादेश, नेपाळ व भुतानच्या सीमेवर ७०० ट्रक कांदा अडकून पडला होता. त्यामुळे निर्यातदार व शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. यावर पुनर्विचार करून वाणिज्य मंत्रालयाने कस्टमकडे नोंदविलेल्या कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र अजूनही अनेक कंटेनरसंबंधी तोडगा न निघाल्याने निर्णय झाला, मात्र त्यात अद्याप स्पष्ट भूमिकेचा अभाव असल्याचे निर्यातदारांचे मत आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून कंटेनर बंदरावर आहेत, तर देशाच्या पूर्व भागात सीमेवर ट्रक उभे आहेत. परिणामी कांदा गुणवत्ता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आता या निर्णयामुळे ‘कस्टम’कडे नोंदणी होऊन ‘शिपिंग’चे बिल झालेला कांदा निर्यातीसाठी रवाना होणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. 

ही आहे निर्यातदारांची मागणी वाणिज्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार कस्टमकडून निर्यातबंदीपूर्वी १३ तारखेपर्यंत पास मिळालेल्या व नोंदविलेल्या निर्यातीस परवानगी दिली आहे. मात्र, निर्यातबंदी होण्यापूर्वी त्याच दिवशी (ता.१४) पोहचलेल्या व बंदरावर जाण्यासाठी निघालेल्या आणि मंगळवारी (ता.१५) पोहचलेल्या वाहनांना बंदरावर पास मिळाला नसल्याने त्यांनाही परवानगी द्यावी, अशी निर्यातदारांची मागणी आहे. मात्र याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले. प्रतिक्रिया १३ सप्टेंबरपर्यंत निर्यात मागणीपत्र ज्यांना मिळाले आहे, त्यांना कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र १४ सप्टेंबर व पुढील नोंदणी झालेल्या कांद्याबाबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.  -मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड सरकारचा निर्णय परिस्थितीनुसार आहे. किमान निर्यात मूल्य वाढवणे हा पर्याय रास्त आहे. मात्र निर्यातबंदी हा निर्णय अडचणींचा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पत खराब होत आहे. शेतकऱ्यांसाठी योग्य दर देण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचे पुन्हा दिसून आले आहे.  -चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com