agriculture news in Marathi export permission for onion which on port and borders Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

 निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर ४०० हून अधिक तर बांगलादेश, नेपाळ व भुतानच्या सीमेवर ७०० ट्रक कांदा अडकून पडला होता.

नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर ४०० हून अधिक तर बांगलादेश, नेपाळ व भुतानच्या सीमेवर ७०० ट्रक कांदा अडकून पडला होता. त्यामुळे निर्यातदार व शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. यावर पुनर्विचार करून वाणिज्य मंत्रालयाने कस्टमकडे नोंदविलेल्या कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र अजूनही अनेक कंटेनरसंबंधी तोडगा न निघाल्याने निर्णय झाला, मात्र त्यात अद्याप स्पष्ट भूमिकेचा अभाव असल्याचे निर्यातदारांचे मत आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून कंटेनर बंदरावर आहेत, तर देशाच्या पूर्व भागात सीमेवर ट्रक उभे आहेत. परिणामी कांदा गुणवत्ता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आता या निर्णयामुळे ‘कस्टम’कडे नोंदणी होऊन ‘शिपिंग’चे बिल झालेला कांदा निर्यातीसाठी रवाना होणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. 

ही आहे निर्यातदारांची मागणी
वाणिज्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार कस्टमकडून निर्यातबंदीपूर्वी १३ तारखेपर्यंत पास मिळालेल्या व नोंदविलेल्या निर्यातीस परवानगी दिली आहे. मात्र, निर्यातबंदी होण्यापूर्वी त्याच दिवशी (ता.१४) पोहचलेल्या व बंदरावर जाण्यासाठी निघालेल्या आणि मंगळवारी (ता.१५) पोहचलेल्या वाहनांना बंदरावर पास मिळाला नसल्याने त्यांनाही परवानगी द्यावी, अशी निर्यातदारांची मागणी आहे. मात्र याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
१३ सप्टेंबरपर्यंत निर्यात मागणीपत्र ज्यांना मिळाले आहे, त्यांना कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र १४ सप्टेंबर व पुढील नोंदणी झालेल्या कांद्याबाबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. 
-मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड

सरकारचा निर्णय परिस्थितीनुसार आहे. किमान निर्यात मूल्य वाढवणे हा पर्याय रास्त आहे. मात्र निर्यातबंदी हा निर्णय अडचणींचा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पत खराब होत आहे. शेतकऱ्यांसाठी योग्य दर देण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचे पुन्हा दिसून आले आहे. 
-चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड


इतर अॅग्रो विशेष
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...