agriculture news in Marathi export promotion council for fruit export Maharashtra | Agrowon

फळपिकांच्या निर्यातीसाठी एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सील 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

केंद्र सरकारस्तरावर फळपिकाची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल त्याबाबत आग्रही आहेत. त्यांच्याच पुढाकाराने एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापण्याच्या हालचाली होत आहेत. 
- सोपान कांचन, अध्यक्ष, महाग्रेप  

नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या निर्यातीचा अपेक्षीत उद्देश साध्य झाला नाही. त्यापार्श्‍वभूमीवर फळ निर्यातीला चालना मिळावी यासाठी एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या संदर्भात प्राथमिकस्तरावर दोन बैठकाही झाल्याचे सांगण्यात आले. 

यासाठी द्राक्ष उत्पादक संघाने पुढाकार घेतला. शेतकरीस्तरावर देखील संशोधन, तंत्रज्ञान सुधार आणि त्याचा अवलंब या बाबींना प्राधान्य देण्यात आले. जागतीकस्तरावरील निर्यातक्षम द्राक्ष वाणांचा शोध घेत त्याची लागवड करण्यात आली. द्राक्ष उत्पादक संघाचे देखील शासनस्तरावरुन बळकटीकरण होऊन देशात द्राक्ष निर्यातीला उभारी मिळाली. या बाबतीत डाळींब, आंबा, सफरचंद आणि त्यातही संत्रा मात्र उपेक्षीतच राहिला. नागपूरी संत्रा चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपतो. परंतू या फळाला राजाश्रय न मिळाल्याने संत्र्यांची निर्यात क्षेत्रातून पिछेहाट झाली. 

देशातील फळपिक उत्पादकांना निर्यातीचे बळ मिळावे याकरिता आता केंद्र सरकारचा कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. त्या अंतर्गंत पहिल्या टप्प्यात द्राक्ष, डाळींब, सफरचंद, आंबा तसेच संत्रा या पीकांच्या निर्यातीला चालना दिली जाणार आहे. त्याकरिता निर्यातक्षम फळपिकातील तज्ज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञांचा समावेश असलेली एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्यात येणार आहे.

अपेडा, अन्न प्रक्रिया विभाग या विभागाचाही या कौन्सीलमध्ये समावेश प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या विषयावर केंद्रीय पातळीवर दोन बैठकाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्या संत्रा निर्यात अवघी 30 टक्‍के असून ती बांग्लादेशपूरतीच मर्यादीत आहे. 

क्‍लस्टरनिहाय्य होणार लागवड 
निर्यातक्षम फळपिकाच्या उत्पादनाकरीता क्‍लस्टर लागवड व व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता शेतकरी कंपन्यांची मदत घेण्याचे प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले. 

 
 


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...