केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान कायम ठेवावे

केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.
केंद्राने साखर निर्यातीसाठी  अनुदान कायम ठेवावे For export of sugar by the Center Grants should be maintained
केंद्राने साखर निर्यातीसाठी  अनुदान कायम ठेवावे For export of sugar by the Center Grants should be maintained

शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी. त्या शिवाय साखर उद्योग अडचणीतून बाहेर पडणारा नाहीत, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यात रोलर पूजन व आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर उपस्थित होते.  आमदार नाईक म्हणाले, ‘‘२०२०-२१ कोरोना संसर्ग असतानाही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करीत गळीत हंगाम यशस्वी केला. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठे सहकार्य केले. या हंगामातील गाळप उसाला आतापर्यंत पाहिले व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २ हजार ७५० रुपये अदा केले आहेत. अंतिम बिल दिपावलीस देऊन दीपावली गोड करणार आहे.’’  प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. या वेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, संचालक  विजयराव नलवडे, संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, तानाजी वनारे, दत्तात्रय पाटील, यु. जे. पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com