Agriculture news in marathi For export of sugar by the Center Grants should be maintained | Agrowon

केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान कायम ठेवावे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.

शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किमत ३१०० ऐवजी ३ हजार ५०० रुपये करावी. त्या शिवाय साखर उद्योग अडचणीतून बाहेर पडणारा नाहीत, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यात रोलर पूजन व आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, ‘‘२०२०-२१ कोरोना संसर्ग असतानाही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करीत गळीत हंगाम यशस्वी केला. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठे सहकार्य केले. या हंगामातील गाळप उसाला आतापर्यंत पाहिले व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २ हजार ७५० रुपये अदा केले आहेत. अंतिम बिल दिपावलीस देऊन दीपावली गोड करणार आहे.’’ 

प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आठ मेगावॉट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. या वेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, संचालक  विजयराव नलवडे, संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, तानाजी वनारे, दत्तात्रय पाटील, यु. जे. पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...