agriculture news in Marathi exportable grapes registration started Maharashtra | Agrowon

निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते.

नाशिक: द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२०-२१च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे.

कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगांची हमी देण्याकरिता ‘ग्रेपनेट’व्दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी होते. त्यानुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांकरिता कायदेशीर प्रमाणित केलेल्या कीडनाशकांची यादी व द्राक्ष बागांसंबंधी चालू हंगामाकरिता वापरण्याच्या कृषी कीडनाशकांची यादी अंतिम करुन ग्रेपनेट प्रणालीवर २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे. त्या अनुषंगाने निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी ग्रेपनेट  ऑनलाइन प्रणाली ८ ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी तसेच नूतनीकरण करण्यासाठी कृषी साहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे संपर्क साधून त्वरित अर्ज करण्यात यावेत असे, आवाहन करण्यात आले 
आहे.

अर्ज करण्याची पद्धत 
निर्यातक्षम द्राक्ष बाग नूतनीकरणासाठी फक्त 
अर्ज करण्याची गरज आहे. तर नव्याने नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, ८अ, बागेचा नकाशा व ५० रुपये नोंदणी फी आवश्यक आहे. ‘ग्रेपनेट’व्दारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. २०१९-२० हंगामात ३३, ४५१ निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...