नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला द्राक्ष निर्यात

Exports of grapes to Dubai from the marketing center
Exports of grapes to Dubai from the marketing center

नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या द्राक्षांची थेट खरेदी करून द्राक्षांची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे. 

कळवण तालुक्यातील भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त निर्यात केंद्र वातानुकूलित अशा स्वरूपाचे बांधण्यात आले आहे. या ठिकाणी शेतीमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने निर्यात होऊ लागली आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी व कळवण बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या सहकार्यातून सदगुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून द्राक्षाची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे. 

शेतीमालाची साठवणूक करून त्याची निर्यात करण्याची सुविधा भेंडी येथील कांदा, द्राक्ष सुविधा केंद्रात आहे. या भागातील मानूरचे भूमिपुत्र तत्कालीन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार व कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या वतीने सुविधायुक्त निर्यात सुविधा केंद्र कळवण तालुक्यात उभारण्यात आले आहे. त्यामुळेच कसमादे पट्ट्यातील शेतीमाल निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. द्राक्ष निर्यातीसाठी हाताळणी, प्रतवारी व वातानुकूलित प्रक्रिया करून द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. कसमादे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. 

कृषी व पणन मंडळाचे प्रभारी उपसरव्यवस्थापक बहादूर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. निर्यातदार संस्थेचे प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे, व्यवस्थापक सीताराम बिष्णोई, सांकेतिका जोरे आदी निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत कामकाज पाहत आहेत. थेट शेतात शेतीमालाची खरेदी करून परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती सदगुरू एंटरप्राइजेसचे संचालक प्रशांत नारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे यांनी दिली. 

निर्यातीची स्थिती   मागील वर्षी २६० टन निर्यात झाली होती. तर चालू वर्ष १३ टन सुरुवात झाली. ही निर्यात चालू आडवड्यात ३९ टन पर्यंत जाणार आहे. 

अशी होते खरेदी  कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड तालुक्यांतील द्राक्ष उत्पादकांकडून थेट द्राक्ष खरेदी केली जाते. त्याला प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दर देण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com