प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत झाली मोठी वाढ

देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०१९-फेब्रुवारी २०२० या काळाच्या तुलनेत एप्रिल २०२०-फेब्रुवारी २०२१ या काळात प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत झाली मोठी वाढ Exports of processed foods increased significantly
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत झाली मोठी वाढ Exports of processed foods increased significantly

नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अडचणींच्या काळात एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०१९-फेब्रुवारी २०२० या काळाच्या तुलनेत एप्रिल २०२०-फेब्रुवारी २०२१ या काळात प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी (ता. २३)  देण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात एकूण ४३,७९८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.

या घटकांची निर्यात वाढली डाळी, प्रक्रिया केलेल्या पालेभाज्या, फळे, ज्यूस, भुईमूग, गवार गम, तृणधान्याचे पदार्थ, अल्कोहोलजन्य पदार्थ, तेलजन्य पदार्थ आदींची निर्यात वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत झोलेली वाढ मागील आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे सॉस,  विविध प्रकारचे पीठ आणि डाळीच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांत हीच निर्यात ३३ टक्के इतके होती. 

तृणधान्य आधारित पदार्थांची १८ टक्के वाढ झाली आहे.  प्रक्रिया केलेली फळे आणि ज्यूसच्या निर्यातीत १२ टक्क्यांनी तर शेंगदाण्याच्या निर्यातीत ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेलजन्य पदार्थांच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल ९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर देशातून निर्यात होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत एकूण २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाच वाढीचा कल आगामी आर्थिक वर्षांतही कायम ठेवण्याचा संकल्प अपेडाने केला आहे.

या देशांत झाली निर्यात देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटनसह अरबी देश आणि पूर्वेकडील देशांना झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने या निर्यात वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. देशातील निर्यातदार आणि विविध देशांतील आयातदारांची ऑनलाइन बैठका, वेबिनार, खाद्यपदार्थांची जाहिरात, निर्यात प्रमाणपत्र, सामंजस्य करार आदी मार्गाने निर्यात वृद्धी करण्यात आली, अशी माहिती अपेडाकडून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com