Agriculture news in marathi Exports of processed foods increased significantly | Agrowon

प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत झाली मोठी वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 एप्रिल 2021

देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०१९-फेब्रुवारी २०२० या काळाच्या तुलनेत एप्रिल २०२०-फेब्रुवारी २०२१ या काळात प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे

नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अडचणींच्या काळात एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०१९-फेब्रुवारी २०२० या काळाच्या तुलनेत एप्रिल २०२०-फेब्रुवारी २०२१ या काळात प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी (ता. २३)  देण्यात आली.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात एकूण ४३,७९८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.

या घटकांची निर्यात वाढली
डाळी, प्रक्रिया केलेल्या पालेभाज्या, फळे, ज्यूस, भुईमूग, गवार गम, तृणधान्याचे पदार्थ, अल्कोहोलजन्य पदार्थ, तेलजन्य पदार्थ आदींची निर्यात वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत झोलेली वाढ मागील आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे सॉस,  विविध प्रकारचे पीठ आणि डाळीच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांत हीच निर्यात ३३ टक्के इतके होती. 

तृणधान्य आधारित पदार्थांची १८ टक्के वाढ झाली आहे. 
प्रक्रिया केलेली फळे आणि ज्यूसच्या निर्यातीत १२ टक्क्यांनी तर शेंगदाण्याच्या निर्यातीत ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेलजन्य पदार्थांच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल ९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर देशातून निर्यात होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत एकूण २६.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाच वाढीचा कल आगामी आर्थिक वर्षांतही कायम ठेवण्याचा संकल्प अपेडाने केला आहे.

या देशांत झाली निर्यात
देशातून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटनसह अरबी देश आणि पूर्वेकडील देशांना झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने या निर्यात वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. देशातील निर्यातदार आणि विविध देशांतील आयातदारांची ऑनलाइन बैठका, वेबिनार, खाद्यपदार्थांची जाहिरात, निर्यात प्रमाणपत्र, सामंजस्य करार आदी मार्गाने निर्यात वृद्धी करण्यात आली, अशी माहिती अपेडाकडून देण्यात आली आहे.


इतर अॅग्रोमनी
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...
कापूस लागवडीत यंदा घट शक्यपुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू...
भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नयेपुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या...
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...