Agriculture news in marathi Extend deadline to pay crop loans: Nana Patole | Agrowon

पीककर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ द्या ः नाना पटोले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

गोंदिया ः पीककर्ज परतफेडीची मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत आहे. परंतू ‘कोरोना’मुळे सध्या सर्वदूर लॉकडाऊन असल्याने ही मुदत वाढवून ३० जून करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकार व ‘नाबार्ड’ला पाठविलेल्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे.

गोंदिया ः पीककर्ज परतफेडीची मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत आहे. परंतू ‘कोरोना’मुळे सध्या सर्वदूर लॉकडाऊन असल्याने ही मुदत वाढवून ३० जून करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकार व ‘नाबार्ड’ला पाठविलेल्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी विविध बॅंकांमधून पीककर्जाची उचल केली आहे. या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत केल्यास त्यांना व्याजसवलत योजनेचा लाभ मिळतो. व्याज सवलत नसलेल्या शेतकऱ्यांना देखील नवे कर्ज घेण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड मंगळवार (ता. ३१) पर्यंतच करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, सध्याची स्थिती बघता शेतकऱ्यांना बॅंकेत जाऊन कर्ज भरणे शक्‍य नाही. 

‘कोरोना’मुळे राज्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. इतरही निर्बंध स्थानिकस्तरावर लागू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाहेर पडण्याची अडचण होत आहे. त्यामुळे कर्ज भरण्यासाठी असलेल्या व्याज सवलत योजनेला वाढीव कालावधी मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी अशा आशयाचे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, केंद्र सरकार आणि ‘नाबार्ड’ला पत्र पाठविले आहे. त्याव्दारे पीककर्ज परतफेडीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर केंद्र आणि ‘नाबार्ड’कडून काय निर्णय घेतला जातो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...