`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत वाढवा`

शिल्लक शेतकऱ्यांकडील मका १५ जुलैच्या मुदतीपर्यंत खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र पाठविले. त्याद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी व्हावी म्हणून मुदतवाढीचा विचार व्हावा, असे कळविले आहे. - अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद.
 Extend the deadline for purchase of maize in Aurangabad district
Extend the deadline for purchase of maize in Aurangabad district

औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली शेतकऱ्यांची संख्या पाहता १५ जुलैच्या मुदतीत नोंदणी केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांची मका खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांकडील मका खरेदीसाठी मुदतवाढीचा विचार करावा, असे पत्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यात मक्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी आठ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवरून ७ हजार ४९२ शेतकऱ्यांनी मक्याची आधारभूत किमतीने खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यांपैकी १० जुलै अखेरपर्यंत ४ हजार ३११ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे संदेश पाठविण्यात आले. तर, ३१८१ बाकी होते. संदेश पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी २५६७ शेतकऱ्यांकडील ७१ हजार ८४८ क्विंटल ५० किलो मक्याची खरेदी करण्यात आली. 

आता १५ जुलैपर्यंतच्या मुदतीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडील मका खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेंडे यांनी स्पष्ट केले. अडचणींचा सामना करून जिल्ह्यात रब्बी मकाची आधारभूत किमतीने खरेदी सुरू आहे. मक्याचे उत्पादन व आधारभूत किमतीने खरेदीतील अडचणी बऱ्यापैकी दूर करण्याचे प्रयत्न केल्याची माहितीही दाबशेडे यांनी  दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com