मोसंबीच्या झाडांचे आयुष्य वाढवा : डॉ. पाटील

 Extend the life of swit lemon trees: Patil
Extend the life of swit lemon trees: Patil

जालना : ‘‘बदलत्या हवामानाला तग धरणारे मोसंबी पीक आहे. तिच्या झाडाचे आयुष्य वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंडचा वापर करावा. शिवाय शिफारशीप्रमाणे रासायनिक खताचा वापर केल्यास तो उपयोगी पडतो,’’ असा सल्ला हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात नुकत्याच आयोजित मासिक चर्चासत्रात पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. निवृत्त कृषी अधिकारी एस. एस. पुंड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कोणतेही फळपिक माती परीक्षण केल्याशिवाय घेऊ नये. कमी पाण्यात, कमी खतात अधिक उत्पादन कसे घेता येईल? असे आपले व्यवस्थापन असावे. मोसंबीचे न्युसेलर हे वाण मराठवाड्यात अधिक उत्पादन देते, हे सिद्ध झाले आहे.’’ 

सोनुने म्हणाले, ‘‘मोसंबी पिकात उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बहार व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्याचा मातीशी संबंध आहे. जिल्ह्यात कापूस, तूर, मका, बाजरी पिकाबरोबरच फळबागांमध्ये मोसंबी हे पीक पूर्वीपासून घेतले जाते. मोसंबीचे चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मोसंबी आंतरराष्र्टीय बाजारात कशी जाईल? यासाठी तयारीला लागण्याची गरज आहे.’’

पुंड म्हणाले, ‘‘माती परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी खतमात्रा द्याव्यात. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा. आवश्‍यकतेनुसार आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच रासायनिक खताच्या मात्रा द्याव्या म्हणजे जमिनीचे आरोग्य चांगले राहील.’’ मृदशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ राहुल चौधरी यांनी आभार मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com