साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा : इस्मा

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) मे महिन्यातील साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा : इस्मा
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा : इस्मा

कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) मे महिन्यातील साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाला पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे. ‘इस्मा’चे महासंचालक अबिनाश वर्मा यांनी पत्रात म्हटले आहे, की लॉकडाउनमुळे रेस्टॉरंट, मॉल, थिएटर अजून पूर्णपणे खुले झाले नाहीत. मे २०२० दरम्यान साखर विक्री अजूनपर्यंत सामान्य झालेली नाही. ज्यामुळे मे महिन्याचा मासिक विक्री कोटा पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवणे आवश्यक आहे. देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात, विशेषकरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेची विक्री मे २०२० मध्ये त्यांना दिल्या गेलेल्या कोट्यापेक्षा कमी राहिली. देशात अनेक ठिकाणी मजूर आपापल्या गावी जात असल्याने शहरी भागातील साखर विक्री कमी झाली आहे लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर एप्रिल २०२० च्या तुलनेत मेमध्ये साखरेच्या विक्रीत सुधारणा झाली आहे. पण लॉक डाउन अद्यापही कायम राहिल्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये साखर कारखाने आपल्या कोट्यानुसार साखरेची विक्री करू शकले नाहीत. ही परिस्थिती पाहता मे महिन्यातील साखर कोट्याच्या विक्रीसाठी १० जून २०२०पर्यंत मुदत वाढवावी, अशी मागणी ‘इस्मा’ने केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com