agriculture news in marathi Extending the import period of tur, urad will have little effect | Page 2 ||| Agrowon

तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल अल्प परिणाम

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा कालावधी वाढविला आहे. आयातदारांना मुक्त आयात धोरणांतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारीपर्यंत आयात करता येणार आहे.

पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा कालावधी वाढविला आहे. आयातदारांना मुक्त आयात धोरणांतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारीपर्यंत आयात करता येणार आहे. या निर्णयाने आयातदारांना दिलासा 
मिळाला. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि कडधान्याची उपलब्धता बघता या निर्णयाचा अल्प परिणाम होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

यापूर्वी सरकारने कडधान्याची मुक्त आयात धोरणांतर्गत परवानगी देताना ३१ ऑक्टोबरपर्यंत आयातीचे व्यवहार (बिल ऑफ लॅण्डिंग) झालेल्या मालाची ३० नोव्हेंबरपर्यंत आयात करण्यास परवानगी दिली होती. यात वाढ करून आता ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आयात करता येणार आहे.

कडधान्य उत्पादनाला फटका?
अलीकडेच कडधान्य उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन पल्सेस ॲण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या (आयपीजीए) उपाध्यक्षांनी देशात जून आणि जुलै महिन्यांत तब्बल तीन आठवड्यांत पावसाने दडी मारल्याने आणि नंतर मुसळधार पावसाने खरिपातील तूर, मूग आणि उडदाला मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे देशांतर्गत कडधान्य पुरवठा प्रभावित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी सांगितले. 

सणासुदीत ग्राहकांना दिलासा; शेतकऱ्यांचे काय?
कडधान्य उद्योग आणि व्यापारातील संस्थांनी खरिपात नुकसान झाल्याने कडधान्य उत्पादनात घट होण्याची भीती वर्तविली. त्यामुळे भाववाढ होऊन ग्राहकांना फटका बसेल, असे मत व्यक्त केले. परिणामी, केंद्र सरकारने आयातीसाठी दारे उघडी केली. परिणामी, मूग आणि उडदाचे कडधान्याचे बाजारभाव घसरले. पीक नुकसान होऊन उत्पादन कमी होऊन डाळ महाग होईल याचा विचार सरकारने केला, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांना चांगला दर मिळाला पाहिजे याचा विसर मात्र केंद्र सरकारला पडला. आयात करून बाजारात हस्तक्षेप केला आणि दर पाडले, असा आरोप शेतकरी करत आहेत.

कंटेनर, जहाज उपलब्धतेअभावी अडथळे
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना आयातीसाठी परवानगी दिली खरी, मात्र मालवाहतुकीसाठी कंटेनर तसेच जहाजांची कमतरता आणि वाढलेले वाहतूक भाडे यामुळे आयातदारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारकडे म्यानमारमधून आयातीसाठी ६० दिवस आणि आफ्रिकेतून आयातीसाठी ९० दिवसांचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. आफ्रिकेच्या पूर्व भागात कडधान्याची काढणी ऑगस्टमध्ये सुरु होते आणि शिपमेंट सप्टेंबरमध्ये सुरू होते. मात्र कंटेनर आणि जहाजांच्या कमतरतेने येथील निर्यात प्रभावित होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....