बुलडाणा जिल्ह्यात तेरा बाजार समित्यांच्या प्रशासकांना मुदतवाढ

खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपला आहे. या महिन्यात निवडणूक होणार होती. मात्र, ग्राम सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
 Extension of Administrators of Thirteen Market Committees in Buldana District
Extension of Administrators of Thirteen Market Committees in Buldana District

खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपला आहे. या महिन्यात  निवडणूक होणार होती. मात्र, ग्राम सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. येत्या मार्च महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. तोच प्रशासक पदांचीही मुदत संपल्याने शासनाने पुन्हा या प्रशासकीय कार्यकारिणीला मुदतवाढ दिली आहे. यामुळे किमान तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. 

ऑक्टोबर महिन्यात मुदत संपून १७ जानेवारी रोजी बाजार समित्यांची निवडणूक घेतली जाणार होती. मात्र, जिल्ह्यातील एकूण ५३९ ग्राम सेवा सहकारी संस्थांपैकी ३९३ सहकारी संस्थांवर प्रशासक होते. त्यामुळे मतदार यादीवर परिणाम होऊन काही बाजार समित्यांची निवडणूक होणार नव्हती. सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकत ग्राम सेवा सोसायट्यांची निवडणूक लागली आहे. 

मार्चमध्ये या ग्रामसेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर नवीन प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम बाजार समित्यांवर राहील. दरम्यान, ग्रामसेवा सोसायट्यांच्या निवडणुका सुरु असतानाच बाजार समित्यांच्या प्रशासक पदाचा कारभार संपला आहे. बाजार समित्यांनीही ठराव घेत प्रशासकपदास मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. शासनानेही या पदास आता मुदतवाढ दिली आहे. आता पुढील टप्प्यात निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल.

प्रशासनाची ओढाताण

बाजार समित्यांचा कारभार चालविण्यासाठी नेमलेले प्रशासक व प्रशासनाचे अधिकारी यांच्यात काही ठिकाणी कारभार करताना ओढाताण सुरु झाली आहे. खर्च, निर्णय प्रक्रियेबाबत मतभेदही होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com