साताऱ्यात जिल्हा बँकेकडून पीककर्जास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

सातारा जिल्हा बँकेने सर्व विकास सेवा सोसायट्यांची पीककर्ज, शेतकरी कॅश क्रेडिट खात्याच्या परतफेडीच्या तारखेत बदल करून शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशीमाहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Extension of crop loans from the District Bank to Satara by 30 June
Extension of crop loans from the District Bank to Satara by 30 June

सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेड करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, सातारा जिल्हा बँकेने सर्व विकास सेवा सोसायट्यांची पीककर्ज, शेतकरी कॅश क्रेडिट खात्याच्या परतफेडीच्या तारखेत बदल करून शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने बँकांच्या कर्जदार सभासदांचे कर्जाचे दायित्व कमी करण्यासाठी सूचित नियामक उपाययोजनांची अंमलबजावणी संचालकांचा निर्णय करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. त्यानुसार मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधीत वसूलपात्र असलेल्या पीककर्ज , शेतकरी कॅश क्रेडिट कर्जास ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधीत वसूलपात्र असणाऱ्या पीककर्ज, शेतकरी कॅश क्रेडिट कर्जास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची पीककर्ज खात्याची मुदत एक मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधीत संपणार आहे. अशा सर्व पीककर्ज व शेतकरी कॅश क्रेडिट कर्ज खात्याची मुदत संपण्याची तारीख ३० जून २०२० अशी अद्ययावत करून घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा बँकेने विकास सेवा सोसायट्यांना केली आहे, असे डॉ. सरकाळे यांनी स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com