agriculture news in Marathi extension for fertilizers sellers license Maharashtra | Agrowon

खत विक्रेत्यांच्या परवान्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

खत नियंत्रण आदेशानुसार राज्यात वाटप झालेल्या खतविषयक परवान्यांना आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

पुणे: खत नियंत्रण आदेशानुसार राज्यात वाटप झालेल्या खतविषयक परवान्यांना आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या उपसचिव रजनी तनेजा यांनी कृषी आयुक्तालयाला तशा लेखी सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे परवान्यांची प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

“खत नियंत्रण आदेश १९८५ मधील ११ व्या कलमानुसार खत विक्रेत्यांनी परवान्याचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक ठरते. तथापि, या प्रक्रियेला अडचणी येत असल्याच्या तक्रारी विक्रेत्यांनी केल्या आहेत. मंत्रालयाने या तक्रारींची तपासणी केल्यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला,” अशी माहिती उद्योग सूत्रांनी दिली. 

दरम्यान, २० फेब्रुवारी ते ३० जून या कालावधीत मुदत समाप्त होत असलेल्या परवान्यांना ही मुदतवाढ राहील, असे कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

लॉकडाऊन सुरू असल्यामुळे खत विक्रीसारखी अत्यावश्यक सेवा देण्यात खत उद्योगाला अडचणी येवू शकतात. त्यामुळे या यंत्रणेचा त्रास टाळण्यासाठी मुदतवाढीच्या प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश देखील केंद्र शासनाने दिले आहेत. 

ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशातील लाखो खत विक्रेत्यांना या निर्णयाचा फायदा होईल, असे ते म्हणाले. “२१ मार्चपासून निविष्ठा परवान्यांचे नूतनीकरण रखडले होते. नूतनीकरणाची मुदत जूनपर्यंत वाढवून मिळण्याची विनंती आम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. पण हा मुद्दा केंद्रीय विधी मंत्रालय तपासण्यासाठी पाठवला गेला होता,” असे श्री. कलंत्री म्हणाले. 
 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...