agriculture news in marathi, extension for filing of application for onion grant | Agrowon

कांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जानेवारी 2019

अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले अाहे. या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी अाता शुक्रवारपर्यंत (ता. २५) मुदतवाढ देण्यात अाली अाहे. यापूर्वी हे अर्ज १५ जानेवारीपर्यंत दाखल करण्याचे अावाहन शासनाने केले होते. 

अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले अाहे. या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी अाता शुक्रवारपर्यंत (ता. २५) मुदतवाढ देण्यात अाली अाहे. यापूर्वी हे अर्ज १५ जानेवारीपर्यंत दाखल करण्याचे अावाहन शासनाने केले होते. 

राज्यात ज्या शेतकऱ्यांनी एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खासगी बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली अशा शेतकऱ्यांना प्रतिकिलो दोन रुपये अनुदान २०० क्विंटल मर्यादेत देऊ करण्यात अाले अाहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अर्ज देण्याचे अावाहन करण्यात अाले होते. 

१५ जानेवारीपर्यंत असलेली मुदत ही कमी असल्याने शेतकऱ्यांमधून मुदत वाढवून देण्याची मागणी झाली होती. याची दखल घेत अाता शेतकऱ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. २५) बाजार समितीत अर्ज दाखल करता येणार अाहेत. अर्जासोबत शेतकऱ्याने कांदा विक्री केल्याची पावती, कांदा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, ज्या बँकेत खाते उघडलेले असेल त्या बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अशी कागदपत्रे जोडावी लागणार अाहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...