धानखरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

गोंदिया ः रब्बी हंगामातील धानखरेदीला लॉकडाउनचा फटका बसला. त्यामुळे शासकीय धानखरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत धानखरेदीला शुक्रवार(ता. ३१)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आधारभूत किमतीने रब्बी धानाची खरेदी केली जात आहे.
Extension of paddy purchase till 31st July

यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आपला धान विकता आला नाही. ३० जूनपर्यंतच शासकीय धानखरेदीची मुदत होती. मात्र, दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे हजारो क्‍विंटल धान विक्रीअभावी पडून होता. हा धान कसा विकावा, अशा विवंचनेत शेतकरी होते. खरीप हंगामातील सारी कामे सोडून शेतकरी धान खरेदी केंद्रावर गर्दी करून होते. त्यातच ३० जून ही धानखरेदीची शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली. याची दखल घेत धानखरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केला. राज्य सरकारने त्याची दखल घेत केंद्र सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठविला. या सर्व घडामोडीनंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात धानखरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर टाळेबंदीमुळे धानविक्रीत अडचणी आल्या. त्यातच ३० जूनला खरेदीची मुदत संपत असल्याने रबी हंगामातील धान व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागला असता. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता धानखरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र व राज्याकडे केली होती. - प्रफुल्ल पटेल, खासदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com