agriculture news in Marathi extension till 31 July for milk powder scheme Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ८) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

शासनाने एप्रिल २०२० पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी १० लाख लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला ही योजना एप्रिल व मे या २ महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसल्याने या योजनेस १ महिन्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

या १ महिन्याच्या वाढीव कालावधीत सरासरी प्रतिदिन ५ लाख १४ हजार लिटर याप्रमाणे १ कोटी ६० लाख लिटर दुधाचे रुपांतरण भुकटीत केले जाणार आहे. त्यासाठी ५१ कोटी २२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्वीकृत केले जाणार असून त्यापोटी १९० कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे. केंद्राने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाउन घेाषित केला होता.

राज्यानेही १९ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउनमध्ये बाजारात पिशवी बंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण १७ लाख लिटरने कमी झाली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....